एक्स्प्लोर

Satish Wagh Murder Case : प्रेम प्रकरणातून बायकोनेचं सुपारी देऊन खून केला,आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा

Satish Wagh Murder Case : सतीश वाघ यांचा पत्नीनेच प्रेम प्रकरणातून खून केल्याचे समोर आले आहे.

Satish Wagh Murder Case : भाजप आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी खुलासा झालाय. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ (Mohini Wagh) यांनीच त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले आहे. 

प्रेम प्रकरणातून पत्नीने सतीश वाघ यांचा खून केल्याचे समोर 

याबाबत अधिकची माहिती अशी की, आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणी (Satish Wagh Murder Case) त्यांच्याच बायको मोहिनी वाघ हिने सुपारी दिली होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रकरण होतं. या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांना पाच लाखाची सुपारी देऊन संपवण्यात आले आहे. याबाबतची कबुली मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केलाय. 

सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जाणून घेऊयात...या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अक्षय जवळकर याला सुपारी देण्यात आली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.. 

1. मोहिनी वाघ
2. पवनकुमार शर्मा
3. विकास शिंदे
4 . अतिश जाधव - धाराशिव
5. अक्षय जवळकर - सुपारी देण्यात आलेला व्यक्ती. 

संपूर्ण प्रकरण काय आहे?

भाजप आमदार योगेश टीळेकर याचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून अज्ञान स्थळी नेण्यात आलं. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली होती. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Latur Accident : मद्यधुंद चालकाने पहिल्यांदा दुचाकीला उडवलं, लोकांच्या मारहाणीच्या भीतीने ट्रक गल्ली-बोळातून नेला; घरं आणि दुकानं उडवत गेला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
Embed widget