एक्स्प्लोर
Advertisement
Sasoon Dean Sanjiv Thakur : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात चर्चेत असलेले ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी; नेमकं प्रकरण काय?
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालावरुन त्यांना अधिष्ठातापदावरून हटवण्यात आलं आहे.
पुणे : ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालावरुन त्यांना अधिष्ठातापदावरून हटवण्यात आलं आहे. ललित पाटील प्रकरणामुळे संजीव ठाकूर चर्चेत होते. त्यांच्या जागी आता पुर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची अधिष्ठातापदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून संजीव ठाकूर हे नाव चांगलंच चर्चेत होतं.
काय आहे प्रकरण?
पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मध्यावधी बदली झाली होती. त्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पून्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement