एक्स्प्लोर

बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनच्या डॉक्टरांना दणका, दोघांचे निलंबन; वंचितने उघड केला धक्कादायक प्रकार

ससून रुग्णालयातील आदी कुमार या डॉक्टराला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आली आहे.  

पुणे :  पुणे (Pune News) शहरातील ससून रुग्णालय (Sassoon Hospital)  गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलं आहे.  ससून रूग्णालयातील अनेक प्रकरण समोर येत असताना आता पुन्हा एकदा ससून हॉस्पिटलमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ज्या सामाजिक संस्थांकडून बेवारस तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना ससून रुग्णालयात उपचारासाठी येत असतात अशा रुग्णांवर उपचार न करता त्यांना ससूनमधील डॉक्टरांकडून बेवारस ठिकाणी सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आह.  वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे.याबाबत आत्ता ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

ससून रुग्णालयात निलेश नावाचा मध्यप्रदेश येथील 32 वर्षाचा रुग्ण हा 16 जून रोजी ससून रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होते. त्याच्यावर उपचार देखील झाले एवढंच नाही तर त्याच्या पायाची शस्त्रक्रिया देखील झाली आणि कालांतराने तो रुग्ण काही प्रमाणात बरा झाला.  पण शस्त्रक्रिया झालेल्या अवघ्या काही दिवसात निवासी डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला चक्क ऑटो रिक्षामध्ये बसत येरवड्याच्या एका निर्जन स्थळी सोडल्याचे समोर आलं आहे.  जेव्हा हा व्हिडीओ समोर आला तेव्हा  या प्रकरणात ससून रुग्णालयातील आदी कुमार या डॉक्टराला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आली आहे.  जो कोणी यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी सांगितलय.

ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड

गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार वारंवार उघडकीस येत आहे.ससून रुग्णालयात उपचार घेणारे जे बेवारस रुग्ण आहे त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी त्या रुग्णांना निर्जनस्थळी सोडून येत आहे. हा संपूर्ण प्रकार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. 

सखोल चौकशी करण्याची मागणी

सोमवारी पहाटे दीड वाजता हा सगळा प्रकार घडला असून सामाजिक कार्यकर्ते रितेश गायकवाड हे रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभा होता. ससून रुग्णालयातील डॉ. आदीनाथ कुमार आणि त्याच्या एका सहकाऱ्याने निलेश नावाच्या बेवारस रुग्णाला सोडून यायचे आहे येणार का अशी चौकशी केली. काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला आणि हातात सुई, विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात बसवला आणि त्याला अज्ञात स्थळी सोडण्यात आले.  या सगळ्या प्रकरणानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही आक्रमक पवित्रा घेत थेट दिनच्या केबिनमध्ये शिरकाव केला आणि संबंधित डॉक्टराला निलंबनाची कारवाई करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे..

ससून रुग्णालयात उपचार घेणारा किती सुरक्षित? 

ललित पाटील प्रकरण असू द्या किंवा पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरण असू द्या त्या सगळ्या प्रकरणाच्या वेळी ससून रुग्णालय नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.  ससून रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्थानिक आमदारांनी थेट विधानसभेत देखील प्रश्न निर्माण केलेत आणि आता पुन्हा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ससून रुग्णालयात उपचार घेणारी रुग्ण कितपत सुरक्षीत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

हे ही वाचा :

Sassoon Hospital : 'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget