Sharad Pawar: शरद पवारांना दाखवले काळे झेंडे दाखवण्याची तयारी; भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय आहे कारण?
Sharad Pawar: शरद पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा तयारीत असलेल्या भाजपचा कार्यकर्त्यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना काळे झेंडे (black flags) दाखवण्याचा तयारीत असलेल्या भाजपचा कार्यकर्त्यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाट्यगृहाची इमारत ही शासकीय आहे. शासकीय इमारतीचे उद्घाटन हे शासनाच्या वतीने घेतलं जावं अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. तर इमारत अपूर्ण असताना उद्घाटन होत असल्याचा देखील भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्याचबरोबर नाट्यगृहाच्या खुर्च्यांवर लावण्यात आलेल्या खंडोबाच्या पगडीच्या प्रतिमेवर देखील भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी (Police) आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर यावेळी जमलेल्या भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली आहे. तर काम पुर्ण होण्याआधी उद्घाटन करण्याचा धडाका लावल्याचंही कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. ही शासकीय इमारत असताना हा कार्यक्रम घेतला जात आहे. नाट्यगृहाच्या खुर्च्यांवर लावण्यात आलेल्या खंडोबाच्या पगडीच्या प्रतिमेवर देखील लावण्यात आलेल्या आहेत, हा आम्ही आमच्या देवाचा अपमान समजतो, आणि आम्ही या कार्यक्रमाला निधेष दर्शवतो आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तर कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं यावेळी त्यांना नेत असताना त्यांनी पुन्हा घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जेजुरीमध्ये (Jejuri) सुमारे सहा कोटी रुपये खर्चून मल्हार नाट्यगृह उभारण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामांची उद्घाटने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार आहे. जेजुरी नगरपालिकेवर मागील सात वर्षांपूर्वी काँग्रेसची (Congress) सत्ता होती. आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांच्या पुढाकारातून जेजुरीच्या सांस्कृतिक भवनाच्या जागेत सुमारे सहा कोटी रुपये खर्चून आधुनिक मल्हार नाट्यगृह उभारण्यात आलेलं आहे.
त्याचबरोबर जेजुरी शहरात कोट्यवधी रुपये खर्चून दहा विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित असणार आहेत, मात्र, या उद्घाटन कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर यावेळी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली आहे. तर काम पुर्ण होण्याआधी उद्घाटन करण्याचा धडाका लावल्याचंही कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. ही शासकीय इमारत असताना हा कार्यक्रम घेतला जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे.