Ravindra Dhangekar: '...तर मी राजकीय जीवनाचा संन्यास घेईल', गणेश बीडकर यांच्या गंभीर आरोपावर धंगेकरांचं रोखठोक उत्तर
Ravindra Dhangekar: गणेश बीडकरांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, माझ्यावर भाजपचे नेते गणेश बिडकरांनी आरोप केले.
Ravindra Dhangekar: विधानसभा निवडणुकीत नुकतीच काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेले कसब्याचे विद्यमानन आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर काल(शुक्रवारी) भाजप नेते गणेश बीडकर यांनी गंभीर आरोप केले. गणेश बीडकर यांनी पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील महत्त्वपूर्ण अशा लक्ष्मी रोडवर मालमत्ता हडपल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे पुण्यातील राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे, त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी या आरोपांवर उत्तर देत बीडकरांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
गणेश बीडकरांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, माझ्यावर भाजपचे नेते गणेश बिडकरांनी आरोप केले. पण गणेश बीडकर यांची पार्श्वभूमी त्यांना माहितीये. बिडकरच्या घरातून भ्रष्टाचाराची नाडी वाहते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर वक्फ बोर्डाकडून आम्हाला क्लीन चिट मिळाली. खासगी वक्फ बोर्ड होतं. मालकिणीने 1966 मध्ये कर्ज घेतलं तेव्हा केस चालली. त्यानंतर ही जागा विकायची परवानगी मिळाली आणि त्यानंतर ती जागा विकली त्याचे 4 मालक झाले. यात माझ्यासोबत 5 पार्टनर आहे. पाच लोकांनी जागा 15 वर्षांनी खरेदी केली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
आम्ही नॅशनल बॅंकेच कर्ज घेतलं, आमच्यावर प्रत्येकी 5 कोटी कर्ज आहे. ज्यांच्यावर मंगळसूत्र चोरीचे पोलीस स्टेशनाला आरोप आहेत. समर्थ पोलीस ठाण्यात हे बॅनर लागले होते. रविवार पेठेतील प्रत्येकाने ते पाहिले आहेत. काल ज्या बीडकरांनी दोन मुस्लीम बांधव सोबत आणले होते ते त्यांच्या मामांचे मुलं आहेत. मी एक जरी भ्रष्टाचार केला असेल तर मी राजकीय जीवनाचा संन्यास घेईल. माझ्या पत्नीवर आरोप केले हे योग्य नाही. याचा सात बारा आमच्याकडे आहेत. माझ्या कुटुंबावर जाऊ नका, आम्ही चोर असेल तर आज जेलमध्ये टाका. आजच गुन्हा दाखल करा. घरावर कर्ज आहे. काही असेल तर आजही जेल मध्ये जाऊ पण आम्हाला डाग लावायचं प्रयत्न करू नका, असं उत्तर धंगेकरांनी गणेश बीडकरांना दिलं आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने मला बदमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर करू नका. आमच्यावर तीर मारायचा प्रयत्न करत असाल तर दुसरा तीर आमच्या हातात आहे. बीडकर हा माणूस हा लहान माणूस आहे. पण, यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे. मला भीक घालण्याचा प्रयत्न करू नका. मी भीक घालू देणार नाही. भाजपात येणार नाही. काँग्रेसचा आहे इथेच राहणार आहे; असा टोला देखील त्यांनी यावेळी फडणवीसांना लगावला आहे.