एक्स्प्लोर

राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....

MP Sunetra Pawar and youth leader Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सुनेत्रा पवार समोर आल्यानंतर राजकारणाचा कोणताही अडसर न ठेवता काकी सुनेत्रा पवार यांचा आशीर्वाद घेत संस्कृती जपली.

बारामती : बारामतीमध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार (MP Sunetra Pawar and youth leader Yugendra Pawar) आमनेसामने आले. यावेळी युगेंद्र पवार यांनी नमस्कार करत खासदार सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेतले. युगेंद्र पवारांनी सुनेत्रा पवार समोर आल्यानंतर राजकारणाचा कोणताही अडसर न ठेवता काकी सुनेत्रा पवार यांचा आशीर्वाद घेत संस्कृती जपली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांनी शास्त्री यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या अभिवादनावेळी बारामती नगरपालिका आवारातील शास्त्री यांच्या पुतळ्या समोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने आले. 

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार आमदार बॅनर

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे  (Yugendra Pawar) फिक्स आमदार म्हणून बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. 

लोकसभा निवडणुकांवेळी पवार विरुद्ध सुळे असा राजकीय सामना रंगला होता. मात्र, तो सामना पवार विरुद्ध पवार असा काका विरुद्ध पुतण्या असाच होता. आता, बारामती विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. कारण युगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. यात्रेच्या निमित्ताने गावागावात युगेंद्र पवार जाऊन शरद पवार यांची भूमिका लोकांना समजून सांगत आहेत. अजित पवार यांनी बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर युगेंद्र पवार आता मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.    

दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल

बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
Prashant Kishore : बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
Govinda : यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 02 October 2024 : ABP MajhaShivneri Sundari hostesses : शिवनेरी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी, एसटी कर्मचारी संघटेनकडून टीकाTop 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 4 PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSai Baba Idol : साईबाबांसाठी महाराष्ट्र एकवटला; बावनकुळे, थोरात म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
Prashant Kishore : बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
Govinda : यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
4,500 रुपयांत पितळाचे दोन हंडे घेतले, त्यावर एकनाथ शिंदेंचे नाव टाकले; लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भावूक
4,500 रुपयांत पितळाचे दोन हंडे घेतले, त्यावर एकनाथ शिंदेंचे नाव टाकले; लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भावूक
Bihar Flood : बिहारमधील प्रलयकारी पुरासमोर हेलिकॉप्टरही हतबल! ब्लेड तुटल्याने थेट पाण्यात हार्ड लँडिंग'
बिहारमधील प्रलयकारी पुरासमोर हेलिकॉप्टरही हतबल! ब्लेड तुटल्याने थेट पाण्यात हार्ड लँडिंग'
Prakash Ambedkar : नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या का झाडल्या? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या का झाडल्या? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
Chandrakant Patil on Prakash Abitkar : चंद्रकांतदादांकडून राधानगरीमधून प्रकाश आबिटकरांच्या उमेदवारीची घोषणा; मंत्रिपदावर काय म्हणाले?
चंद्रकांतदादांकडून राधानगरीमधून प्रकाश आबिटकरांच्या उमेदवारीची घोषणा; मंत्रिपदावर काय म्हणाले?
Embed widget