एक्स्प्लोर
प्रेमसंबंधातून पुण्यातील विवाहित तरुणाची नगरमध्ये हत्या
पुण्यातील कोथरुड परिसरातून रविवारी दुपारी शेखरचं अपहरण झालं. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतला नेऊन त्याची हत्या करण्यात आली.

प्रातिनिधिक फोटो
पुणे : लग्नानंतरही तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवल्यामुळे तरुणीच्या नातेवाईकांनी युवकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील 25 वर्षीय तरुणाची अहमदनगरला नेऊन हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चिंचवडमध्ये राहणाऱ्या शेखर पाचवे या तरुणाचं अपहरण करण्यात आलं. पुण्यातील कोथरुड परिसरातून रविवारी दुपारी शेखरचं अपहरण झालं. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतला नेऊन त्याची हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. हत्येप्रकरणी सौरभ कंधारे आणि बंटी ऊर्फ प्रमोद वाघ यांना अटक करण्यात आली आहे. तर दोन अल्पवयीन तरुण फरार झाले आहेत. मयत शेखर पाचवेचा विवाह झाला असून त्याला मुलं आहेत. लग्नानंतरही आरोपीच्या नातेवाईक तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. आरोपीने त्याला हे संबंध तोडण्यास बजावूनही प्रेम प्रकरण सुरुच होते. रविवारी दुपारी शेखर कामानिमित्त कोथरुड परिसरात आला होता. त्यावेळी आरोपी त्याला भेटण्यासाठी गेले. त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी त्याला मारहाण करत कारमधून नेलं. त्याला नगर जिल्ह्यातील कर्जत या गावी नेऊन त्याचा निर्घृण खून केला. शेखरला रस्त्यावर मारहाण करत कारमध्ये घालताना काही पादचाऱ्यांनी पाहिलं होतं. याबाबत त्यांनी कोथरुड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेऊन तपास केला. त्यावेळी आरोपी कर्जतला गेल्याचं समोर आलं. त्यानंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक























