एक्स्प्लोर

Pune Weather Update : पुण्यात उकाडा वाढण्याची शक्यता; ऊन पावसाच्या खेळाने पुणेकर हैराण

पुणे शहर आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी उन्हाचा चटका पुन्हा एकदा वाढू लागला आहे.गेल्या तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

पुणे : पुणे शहर आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव (Pune Weather Update) कमी झाला असला तरी उन्हाचा चटका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून 37.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  ढग निरभ्र झाल्याने पुढील तीन दिवस कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शनिवारी (11 मे) व रविवारी (12) शहरात जोरदार पाऊस झाला. परिणामी, शहराचे कमाल तापमान - जे पूर्वी 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते - 31 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.  गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने शहरवासियांना काहीसा दिलासा दिला होता, मात्र तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली. लोहगाव येथे 36 अंश सेल्सिअस, तर शिवाजीनगर येथे 37.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

शहर व परिसरात गुरुवारी 16 मेला दुपारपर्यंत प्रामुख्याने आकाश निरभ्र होतं, ढगाळ वातावरण होतं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी ( 17 मे) आणि शनिवारी (18 मे) पुण्यात कमाल तापमानात 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल, तर रविवारी (19 मे) तापमान 40 अंशसेल्सिअसपर्यंत पोहोचेल.

राज्यातलं वातावरण कसं असेल?

पुढील 24 तासात राज्यात विविध भागात पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेला इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरीमुळे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील. काल कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर पाहायला मिळाला. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्येही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात. तर पंढरपुरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget