Pune Weather Update : सकाळी गारवा अन् दुपारी उन्हाचे चटके; पुणेकरांनो गॉगल, टोपी अन् पाण्याची बाटली जवळ ठेवा!
पुण्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा उकाडा सातत्याने वाढत आहे. त्यातच रात्री गारठा तर दिवसा उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत.शहरात दुपारी 12 ते 4:00 या वेळेत कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर जात आहे.
पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून (Pune Weather Update) उन्हाचा उकाडा सातत्याने वाढत आहे. त्यातच रात्री गारठा तर दिवसा (Weather Forecast) उन्हाचे चांगलेच (Pune Heat) चटके बसत आहेत. शहरात दुपारी 12 ते 4:00 या वेळेत कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर जात आहे. त्यामुळे शहरात फिरताना सावधानतेचा इशारा हवामान विभागाने (India Meteorological Department) दिला आहे. शहरातील कमाल व किमान तापमानात रोज एक ते दीड अंशाने वाढ होत आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क आणि लवळे या भागांचे तापमान 38 अंशांवर गेले. मात्र सोमवार लवळे, कोरेगाव, मगरपट्टा, चिंचवड 38 अंशांवर आहे तर चिंचवड, मगरपट्टा, एनडीए या भागांचे तापमान 3 ते 4 अंशांनी वाढले. त्यामुळे दुपारी 12ते 4: 00 पर्यंत फिरताना गॉगल, टोपी अन् पाण्याची बाटली जवळ ठेवा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. पुण्यातील सोमवारचे कमाल किमान तापमान कोरेगाव पार्क 38 अंश मगरपट्टा 38अंश , लवळे 38अंश , चिंचवड 37अंश , शिवाजीनगर 37 अंश , पाषाण 36 अंश , लोहगाव 36 अंश , एनडीए 37अंश नोंदवलं गेलं आहे. 12 मार्च ते 17 मार्चपर्यंत वातावरण स्थिर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाच दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. मात्र रात्री गारवा आणि दिवसा चांगलाच उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं नागरिकांना केलं आहे.
राज्यातलं वातावरण कसं असेल?
मात्र, राज्यातील किमान तापमानात अजूनही चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. त्यामुळे सकाळी उकाडा आणि दुपारी कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे.मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत सोमवारी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ नोंदविण्यात आली. राज्यात सर्वाधिक तापमान वाशीम येथे 39.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. अकोला येथे 38.4 अंश सेल्सिअस, वर्धा येथे38.6 अंश सेल्सिअस तर चंद्रपूर येथे 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही सोलापूर39.2 अंश सेल्सिअस , मालेगाव 38.4 अंश सेल्सिअस, सांगली38.6 अंश सेल्सिअस येथे सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.
इतर महत्वाची बातमी-