आधी अपहरण केलं, मारहाण करून जबरदस्तीने गुगल-पे वरुन उकळले पैसे; पुण्यातील वाघोलीतील धक्कादायक घटना
पिडीत व्यक्तीला जबरदस्तीने एका अज्ञात स्थळी नेले आणि तिथे त्यांच्याकडून जबरदस्तीने गुगल पेवरुन 18 हजार रुपये घेतले.
पुणे : भाजी खरेदी करण्यासाठी पायी जाताना धक्का लागल्याने झालेल्या वादातून थेट तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा धक्कदायक (Pune Crime News) प्रकार घडला आहे. पुण्यातील वाघोली रोडवर ही घटना घडली आहे. एवढच नाही तर अपहरण केल्यानंतर जबरदस्तीने गुगल-पे वरुन पैसे उकळले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी पाच तरुणांना अटक केली आहे. लुकमान हासमत हश्मी यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुमार पवार, नितीन पवार, ओम गव्हाणे, मनोज निंबाळकर आणि विकास कांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली रोडवर फिर्यादींचे भाऊ भाजी खरेदी करण्यासाठी पायी गेले होते. त्यावेळी एका 17 वर्षाच्या मुलाने फिर्यादीच्या खांद्याला धक्का दिला, म्हणून फिर्यादीने त्यास "पाहून चालत जा" असे म्हणाले. या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्याच्या साथीदाराने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. मारहणीवरच न थांबता त्या तरुणाने त्याच्या इतर साथीदारांना बोलवून घेतले.
गुगल पेवरुन 18 हजार रुपये उकळले
पिडीतांना चक्क गाडीमध्ये बसवून जबरदस्तीने एका अज्ञात स्थळी नेले आणि तिथे त्यांच्याकडून जबरदस्तीने गुगल पेवरुन 18 हजार रुपये घेतले. या सगळ्या प्रकरणानंतर पिडीत यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून या तरुणांना आज ताब्यात घेऊन अटक केली.
पुण्यात भाईगिरी काही थांबेना; तरुणावर धारदार शस्त्राने चौघांचा हल्ला
पुण्यात भाईगिरी काही थांबण्याचे नाव घेत नाही. पुण्यात एता तरुणावर धारदार शस्त्राने चौघांनी हल्ला केला आहे. एवढच नागी दहशत निर्माण करण्यासाठी रील तयार करून सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. पुण्याच्या वाघोलीतील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत तिघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या हल्यात तरुण गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर तरुणांनी मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर ठेवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमधील चारही आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लोणीकंद पोलीस तपास करत आहे.
हे ही वाचा :
माझ्यावर प्रेम केलं नाही तर..., बीएचएमएसच्या विद्यार्थिनीला वारंवार धमक्या, तरुणीचं भीतीपोटी टोकाचं पाऊल, संभाजीनगर हादरलं!