एक्स्प्लोर

डोक्यावर केळी, हातात पाटी; पुण्याचा केळेवाला सोशल मीडियावर व्हायरल 

Pune Latest News : रस्त्याच्या कडेला मोठ्या आवाजात ‘महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल, केळी घ्या 20 रूपये डझन’ असा आवाज ऐकू आला तर नवल नाही.

Pune Latest News : बदलत्या काळानुसार वस्तू विकण्याच्या पद्धतीही बदलत आहेत.. अधिकाधिक ग्राहक आपल्या दुकानात यावेत,दुकानातील वस्तू विकल्या जाव्यात यासाठी दुकान मालक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. विशेषतः फळं आणि भाज्या विकण्यासाठी त्या विक्रेत्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातोय. अनेकदातर त्यांची विक्री करण्याची स्टाईल बघून येणारे जाणारे लोक थांबतात, त्याचं स्किल पाहून अचंबित होतात. लॉकडाऊनच्या काळात अशाच एका भाजीविक्रेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुण्यातील केळी विक्रेत्याच्या एक व्हिडिओ असाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हसू रोखूच शकणार नाहीत.

रस्त्याच्या कडेला मोठ्या आवाजात ‘महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल, केळी घ्या 20 रूपये डझन’ असा आवाज ऐकू आला तर नवल नाही. ग्राहक पटकन केळी घेणारच. व्यवसाय करण्यासाठी ही शक्कल लढवून बेरोजगारीवर मात करण्याची कमाल केलीय एका तरूणाने. त्याचे नाव नामदेव माने असे आहे. नामदेव मानेला पहिल्या लॉकडाऊनमध्ये नोकरी गमवावी लागली. त्यामुळे बेरोजगारीचे ओझे न वाहता रस्त्यावर बसून केळी विकण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला. तो दिघी परिसरात व्यवसाय करत आहे.

कोरोनामुळे पहिल्या लॉकडाऊनमध्ये हजारो-लाखो लोकांचा रोजगार गेला. त्यामुळे काहींनी हताश होऊन जीवन संपविण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी जिद्दीने नवीन काहीतरी करून जगण्याचा प्रयत्न केला. अशीच जिद्द नामदेव माने याने दाखवली आहे. तो दिघी परिसरातील एका कंपनीत कामाला होता. परंतु, लॉकडाऊन झाले आणि त्याची नोकरी गेली. त्यामुळे आता काय करावे? असा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यातून त्याने रस्त्यावर केळी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. लॉकडाऊन काळात भाजीपाला आणि फळे विकण्यासाठी परवानगी होती. त्यामुळे त्याने केळी विकायला सुरुवात केली. परंतु, ग्राहक येत नसत. मग त्याने हातात केळी घेऊन नृत्य करून ग्राहकांना आकर्षित करणे सुरू केले. त्यामुळे त्याचा व्यवसाय होऊ लागला. पण इतर लोकांना त्याचे वागणे खटकू लागले. त्यामुळे काहींनी त्याच्याविरोधात तक्रार केली. शेवटी त्याने रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी उभे राहून व्यवसाय सुरू केला.

नामदेवने त्याच्या आवाजात एक केळी विक्रीचे गाणे रेकॉर्ड करून रस्त्यावर लावले आहे. त्यामुळे त्याला स्वत:ला ओरडावे लागत नाही. तो संपूर्ण तोंड झाकून, गळ्यामध्ये केळीची किंमत लिहिलेली पाटी घालून डोक्यावर, हातात केळी घेतो. आपल्या या अनोख्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती देताना नामदेव म्हणतो. ''दररोज केळी विकून सुमारे चारशे रूपये मिळतात. पूर्वीच्या लॉकडाऊनने खूप शिकवले आहे, आता पुन्हा लॉकडाऊन नको अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Embed widget