Pune Viral Video: नाही बोलणार मराठी, मी गुजराती आहे, "मॅटर सॉल्व्ह" होण्यापूर्वी नेमकं पुण्यातील व्हिडिओमध्ये काय घडलं?
Pune Viral Video: नेमका हा व्हिडिओ पुणे शहरातल्या कुठल्या भागाचा आहे हे समजलेलं नसलं तरी सुद्धा या व्हिडिओची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

पुणे: मराठी बोलण्यावरून वाद होणारे अनेक व्हिडिओ तुम्ही दररोज सोशल मीडियावर पाहत असाल आता यात आणखी एक भर पडली आहे ती या व्हायरल व्हिडिओमुळे (Pune Viral Video). पुण्यात एका तरुणांकडून "मी मराठी बोलणार नाही मी गुजराती आहे" असं बोलण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यात या तरुणाने एका ठिकाणी त्याचं वाहन पार्क केलं होतं, त्या ठिकाणी सुट्टे पैसे देण्यावरून पार्किंग चालक आणि या तरुणांमध्ये वाद सुरू झाला आणि याचा रूपांतर थेट मराठी विरुद्ध हिंदी भाषा यामध्ये झाले. आधी या तरुणाने मराठी बोलण्यास नकार देत मी गुजराती आहे असं म्हणल्यामुळे अनेकांच्या भावना यावेळी दुखावल्या (Pune Viral Video)गेल्या. या गुजराती भाषिक तरुणाला मराठीऐवजी हिंदीमध्ये बोलल्यामुळे, काही स्थानिक लोकांनी त्याला जाहीरपणे माफी मागण्यास भाग पाडले. नेमका हा व्हिडिओ पुणे शहरातल्या कुठल्या भागाचा आहे हे समजलेलं नसलं तरी सुद्धा या व्हिडिओची (Pune Viral Video) चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.(Pune Viral Video)
Pune Viral Video: व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलंय?
व्हिडिओमध्ये तो कारमध्ये असलेला तरुण म्हणतो, भारतात हिंदीत चालेल, अरे यार शांत व्हा, हिंदीमध्ये बोल, हिंदीमध्ये बोल पण मराठी हिंदी असलं काही बोलू नको, मी गुजराती आहे, तू काय करणार, जर पुढच्याला तुम्ही ओळखत नसाल तर मग कशाला बोलायचं, तुम्ही काय करणार, मी मराठी बोलणार नाही...तर व्हिडिओ काढणारा म्हणतो, तू मराठीत बोल, तू मोठ्या बापाची अवलाद असशील..., तू मराठीमध्ये बोल, त्यावेळी कारमध्ये असलेला तो तरुण म्हणतो, आता तर मी मराठीत बोलतच नसतो, त्यानंतर व्हिडिओच्या शेवटच्या पार्टमध्ये तो तरुण कारमधून बाहेर असलेला दिसतो. त्याच्या आजूबाजूला काही लोक उभे आहेत. त्यावेळी तो माफी मागत म्हणतो, माझ्याकडून जो मराठीचा अपमान झाला तो मी करू इच्छित नव्हतो. पुढच्या वेळेपासून मी हे लक्षात ठेवीन, मी मराठी भाषेचा आधार ठेवीन, आत्ता माझ्याकडून मराठीचा जो अपमान झाला त्याबद्दल मी माफी मागतो, अशा स्वरूपाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
पुण्यात एका तरुणांकडून "मी मराठी बोलणार नाही मी गुजराती आहे" असं बोलण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.#Punenews #viralvideo #Pune #marathivshindi pic.twitter.com/jQT5gbc81C
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) December 9, 2025























