SPPU Admission Process Updates: विद्यार्थ्यांनो कामाला लागा! सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रवेश नोंदणीची 12 जुलै अंतिम तारीख
UG आणि PG या दोन्हीसाठी अनेक विषयांत प्रवेश प्राप्त करण्यासाठी 2022 या वर्षाची नोंदणी सुरु झाली आहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी 12 जुलै 2022 ही शेवटची तारीख असणार आहे.
SPPU Admission Process Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात UG आणि PG या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. UG आणि PG या दोन्हीसाठी अनेक विषयांत प्रवेश प्राप्त करण्यासाठी 2022 या वर्षाची नोंदणी सुरु झाली आहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी 12 जुलै 2022 ही शेवटची तारीख असणार आहे. unipune.ac.in या संकेतस्थळावर तुम्हाला संपुर्ण माहिती प्राप्त होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या UG आणि PG इंटीग्रेटेड प्रोग्राम्समध्ये एडमिशनसाठी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. त्यामुळे बाहेर गावातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. लेट फी सोबत 17 जुलै ही नोंदणीसाठीची अंतिम तारीख असणार आहे.
कसा असेल पेपर पॅटर्न?
दोन तासांचा पेपर असेल. त्यात दोन सेक्शन असतील. पहिल्या सेक्शनमध्ये जनरल नॉलेज, एप्टीट्यूड, लॉजिक यासंबंधित प्रश्न असतील. दुसऱ्या सेक्शनमध्ये तुमच्या विभागाचे प्रश्न असतील. या संबंधित काहीही अधिक माहिती हवी असल्यास पुणे विद्यापीठाच्या या unipune.ac.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
कशी कराल नोंदणी?
1) unipune.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.
2) त्यानंतर तुम्हाला तुमचा मेल आयडीवरुन लॉगईन करावं लागेल
3) Admission क्लिक करुन तुमचा विषय निवडा.
4) तुमची वैयक्तीक माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल.
5) कोर्सची फी भरावी लागणार.
6) फॉर्म चेक करुन सबमिट करावा लागणार.
CET अर्जात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत अंतिम मुदत
महाराष्ट्र राज्य CET सेलने विद्यार्थ्यांना त्यांचे MAH-CET अर्ज दुरुस्त करण्याची परवानगी दिली आहे . अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे.
राज्य सीईटी सेलद्वारे या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. यंदा सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांनी एमएएच-सीईटीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, अर्ज करताना विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्रे, स्वाक्षरी, विषय गट निवडताना चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या चुका सुधारण्याची संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार विद्यार्थांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे