Pune Traffic Diversion: गणेशोत्सवासाठी पुणे शहरात 27 ठिकाणी पार्किंग, वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास, जाणून घ्या पार्किंगची ठिकाणं
Pune Traffic Diversion: गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरात 27 ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान आणि विसर्जनादिवशी हजारो लोक उपस्थित असतात.
पुणे : गणेशोत्सवाच्या दरम्यान शहर परिसरात अनेक नागरिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शहरात येतात. देशासह विदेशातील असंख्य भाविक देखील गणेश मंडळांना भेटी देतात. या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होऊ नये, अपघात होऊ नयेत, तसेच भाविकांना निर्विघ्नपणे गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा, यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरातील मध्यवर्ती भागातील काही रस्ते सायंकाळी ५ नंतर गर्दी संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर गणेशोत्सवानिमित्ताने पुणे शहरात २७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोणकोणत्या ठिकाणी पार्किंगची सोय
गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरात २७ ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान आणि विसर्जनादिवशी हजारो लोक उपस्थित असतात. यादरम्यान अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याने त्यांना वाहने पार्क करण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. पुणे वाहतूक पोलिसांनी याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती भागात २७ ठिकाणी पार्किंगची सोय करून दिली आहे.
शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ, फर्ग्युसन महाविद्यालय, जैन हॉस्टेल, हमालवाडा, नारायण पेठ, BMCC रस्ता, SSPM, SP महाविद्यालय, कर्वे रस्ता, आणि अन्य रस्ते या ठिकाणी चार चाकी पार्किंगसाठी वाहनतळ उपलब्ध असतील.
याशिवाय न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, गोगटे प्रशाला, नारायण पेठ, पेशवे पार्क, सारसबाग, पार्वती ते दांडेकर पूल, मित्रमंडळ चौक, दांडेकर पूल ते गणेश मळा, डेक्कन जिमखाना, आपटे रोड, विमलाबाई गरवारे प्रशाला आणि इतर रस्त्यांवर दुचाकी वाहनांचे पार्किंगसाठी उपस्थित असेल. या सर्व रस्त्यांवर गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात पार्किंगची सुविधा असणार आहे.
सायंकाळी ५ नंतर राहणार बंद; 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर
११ ते १८ सप्टेंबरपर्यंत मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता हे रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत.
शहरातील मुख्य रस्ते बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
सकाळ, सायंकाळ वाहतुकीस बंद असणारे मार्ग
लक्ष्मी रस्ता (इमजे खान चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेथे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक). (Pune Traffic Diversion)
अंतर्गत रस्ते राहणार बंद
सिंहगड गरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैया पाक मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलिस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलिस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरी नानक पथ ते हमजे खान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ), शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, या भागांत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. (Pune Traffic Diversion)
कोणते महत्त्वाचे रस्ते असणार बंद?
1) लक्ष्मी रस्ता - (हमजेखान चौक ते टिळक चौक)
पर्यायी मार्ग - हुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दारूवाला पूल मार्गे, हमजेखान चौक डावीकडे महाराणा प्रताप रोडने घोरपडी पेठ पोलिस चौकी- शंकर शेठ रोडने पुढे जावे. सोन्यामारुती चौक डावीकडे वळून मिर्जा गालीब रोड जंक्शन, (Pune Traffic Diversion)
2) शिवाजी रस्ता - (गाडगीळ पुतळा चौक ते केशवराव जेये चौक, स्वारगेट)
पर्यायी मार्ग - शिवाजीनगर- स्वारगेटकडे जाताना स. गो. बर्वे चौक- जेएम रोड- अलका चौक टिळक रोड, शास्त्री रोडने सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख बोल्हाई चौकमार्गे नेहरू रोडने पुढे. कुंभारवेस चौक : पवळे चौक, साततोटी चौक, उजवीकडे देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रोडमार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी, उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रोड. दुचाकी वाहने गाडगीळ पुतळा, लालमहलपर्यंत सोढण्यात येतील, तेथून दुचाकीस्वारांनी डावीकडे फडके हौद चौकमार्गे दारूवाला पूलमार्गे पुढे इच्छितस्थळी जावे.
3) बाजीराव रस्ता - (पूरम चौक ते एबीसी चौक)
पर्यायी मार्ग - पूरम चौक, टिळक रोडने टिळक चौक उजवीकडे वळून केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक,
4) टिळक रस्ता - (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौका
पर्यायी मार्ग - जेधे चौक, नेहरू स्टेडियम समोरील एकेरी मार्गान जमनलाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पूरम चौक व हिराबाग.