एक्स्प्लोर

Pune Vande Bharat train : पुणेकरांसाठी आणखी दोन वंदे भारत ट्रेन; कोणाला होणार फायदा?

पुण्याहून दोन नव्या वंदे भारत गाड्या सुरू होणार आहे. या नव्या गाड्या पुण्याला वडोदरा आणि सिकंदराबादशी जोडणार आहेत. नरेंद्र मोदी आज विविध शहरांमधून धावणाऱ्या 10 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

पुणे : पुण्याहून दोन नव्या वंदे भारत गाड्या सुरू (Pune Vande Bharat train) होणार आहे. या नव्या गाड्या पुण्याला वडोदरा आणि सिकंदराबादशी जोडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध शहरांमधून धावणाऱ्या 10 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पहिली वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते गांधीनगर दरम्यान सुरू करण्यात आली. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबईगोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू करण्यात आल्या. आता देशात आणखी 10वंदे भारत गाड्या सुरू होणार असून त्यापैकी दोन गाड्या महाराष्ट्रातून असणार आहेत.


देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत आहे. वंदे भारत ट्रेन देशातील विविध ठिकाणांहून अयोध्येला जातात. राज्यात शिर्डीसाठी वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे. पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव अशी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्यातील भाविकांना संत गजानन महाराजांचे दर्शन घेणे सोपे होणार आहे.

स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जनही लाँच करण्यात येणार आहे. बेंगळुरूमध्ये ऑक्टोबर 2023 पासून वंदे भारत एक्सप्रेसस्लीपर प्रोटोटाइपचे काम सुरू आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये राजधानी एक्सप्रेस गाड्यांपेक्षा अधिक चांगल्या सुविधा असतील. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे एकूण 10 सेट तयार केले जात आहेत.

पुणेकरांना तीन वंदे भारत गाड्यांमधून प्रवास करता येणार

सध्या बिलासपूर-नागपूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर-मुंबई वंदे भारत सुरू करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे समितीच्या बैठकीत केली होती. तसेच सध्या मुंबई-सोलापूर मार्गावर पुण्यामार्गे वंदे भारत गाडी धावते, तर नवी पुणे-बडोदा गाडी सुरू करण्यात येणार आहे. प्रस्तावित मुंबई-कोल्हापूर वंदे भारत हा मार्गही पुण्यामार्गे चालविण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांना आता तीन वंदे भारत गाड्यांमधून प्रवास करता येणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

-Pune Metro : आता चांदणी चौक ते वाघोली मेट्रो प्रवास करता येणार; विस्तारीत मार्गिकेला राज्य सरकारची मान्यता

-दिल्लीत शिंदेंची मोठी डील; मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपच्या पारड्यात, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा पत्ता कट, नेमकं समीकरण काय?

 

 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget