एक्स्प्लोर

Pune TET Exam Scam: टीईटी प्रकारणात 3,955 पानाचे दोषारोपपत्र दाखल

टीईटी प्रकरणात आत्तापर्यंत 15 आरोपींना अटक केली असून सुशील खोडवेकर ,प्रितेश देशमुख , तुकाराम सुपे , सुखदेव ढेरे यांचा समावेश आहे. तर याच प्रकरणातील 12 आरोपी अजून फरार आहेत

Pune TET Exam Scam : गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीच प्रकरण हे राज्यभर गाजत आहे.TET पेपर फुटीप्रकरण असेल किंवा आरोग्य भरती पेपर फुटीच प्रकरण असेल पुणे पोलीस आता साऱ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणत आरोपींना अटक करताना दिसत आहेत. आज पुणे सायबर पोलिसांनी टीइटी प्रकरणातील 3955 पानाचं दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. टीईटी प्रकरणात आत्तापर्यंत 15 आरोपींना अटक केली असून सुशील खोडवेकर ,प्रितेश देशमुख , तुकाराम सुपे , सुखदेव ढेरे यांचा समावेश आहे. तर याच प्रकरणातील 12 आरोपी अजून फरार आहेत. त्यांचाही शोध पुणे पोलीस घेत आहेत. यातील दोषारोपपत्र आज दाखल केला असून राहिलेल्या आरोपींना अटक केल्यानंतर या दोषारोपपत्रात अजून वाढ होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


दोन दिवसांपुर्वी 2019 साली झालेल्या टी. ई. टी. अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं होतं.  महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाईदेखील होणार असल्याचं सांगितलं होतं. 2019 ला 16 हजार 705 विद्यार्थ्यांनी टी ई टी परिक्षा दिली होती.त्यापैकी 7800 विद्यार्थ्यां पैसै देऊन परिक्षा पास झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या शहरात आणि गावात बोगस पद्धतीने भरती होऊन नोकरी करणार्‍या शिक्षकांचं धाबं दणाणलं आहे.


म्हाडा परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केला होता. या प्रकरणाचा तपास करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने केली होती. याबाबत समितीने पुणे सायबर पोलिसांना पत्र सुद्धा लिहिलं होतं. शिवाय परीक्षा केंद्रावर घडलेल्या गैरप्रकाराचं सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आणलं होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता ईडी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Pune Traffic Update: पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
Rohit Pawar: सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
Pune News : पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी, वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून राडा; बुलडाण्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधला वाद शिगेला
पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी, वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून राडा; बुलडाण्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधला वाद शिगेला

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
Embed widget