एक्स्प्लोर
पुण्यात प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या, चुलत दीराचा आत्महत्येचा प्रयत्न
चुलत दीराने प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुण्यातील साकोरे भागात घडली आहे.
पिंपरी चिंचवड : पुण्यात पोलिस पाटलाच्या पत्नीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चुलत दीराने प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
पोलिस पाटील देविदास साळवेंची पत्नी संगीता साळवे यांची चुलत दीर शिवाजी साळवे याने हत्या केली. हत्येनंतर शिवाजीने स्वतःचंही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील साकोरे भागात ही घटना घडली.
संगीता घराच्या अंगणात झोपल्या असताना पहाटे पाचच्या सुमारास शिवाजीने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात जखमी झालेल्या संगीता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हल्ला करुन शिवाजीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती असून त्यातूनच ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
क्राईम
Advertisement