Pune : ऋषीपंचमीच्या मुहुर्तावर पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण, गायिका अनुराधा पौडवाल यांची उपस्थिती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीन ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात येते. पहाटे 4.30 वाजल्यापासून अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात झाली.
Pune : पुण्यातील (Pune) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीन ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात येते. याला 35 वर्षांची परंपरा आहे. कोरोनाचे दोन वर्ष ऑनलाईन पध्दतीने झाले. यंदा प्रत्यक्ष पठण करण्यात आले. यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव हे सर्व जण उपस्थित होते.
पहाटे 4.30 वाजल्यापासून अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. दोन वर्षांनी अथर्वशीर्षाचं पठण करताना महिलांमध्ये उत्साह दिसत होता. यावेळी अनुराधा पौडवाल यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.
अनुराधा पौडवाल म्हणाल्या, 'आज खूप सुंदर दृश्य पाहयाला मिळाले आहे. आज आपल्याला आपला धर्म बळकट करण्याची गरज आहे. शंकराचार्य यांनी लिहलेल मी पाठांतर केलं आहे. दगडूशेठ गणपती वेब वर रोज दहा दिवस श्लोक लावावे, असं दोन अडीच महिने करावं.' अशा 100 श्लोकांचे पठण करायचे आवाहन अनुराधा पौडवाल यांनी महिलांना केले.
यावर्षी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून हिमालयातील पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलीय. यासाठी 221 झुंबरांचा वापर करण्यात आल. पंचकेदार हे हिमालयातील शंकराचे मंदिर स्थापत्य वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे. तर विशेष रोषणाई देखील मंदिराला करण्यात आलीये.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर
यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. मात्र, यावर्षी सर्व नियम आणि निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Pune Ganeshotsav 2022 : दगडूशेठ मंदिरात हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला दिमाखदार 'अथर्वशीर्ष पठण सोहळा'
- Ganesh Chaturthi 2022 : पुण्यातील ढोल ताशा पथकांचा इतिहास; कोणी केली सुरुवात? प्रसिद्ध ढोल पथकं कोणती? जाणून घ्या...
- Pune Manache Ganpati : पुण्यातील मानाच्या गणपतींचा मान कुणी घालून दिला? क्रम कसा ठरला?