एक्स्प्लोर
पत्नीच्या हाताचं यश माहिती असतं तर राजकारणात आलोच नसतो : पवार
पुणे : 'आपल्या पत्नी प्रतिभा यांना बारामतीकर गेल्या पन्नास वर्षांपासून ओळखतात. धंद्यात त्यांच्या हाताला चांगलं यश मिळतं, हे आपल्याला माहिती असतं, तर राजकारणात आलोच नसतो', असं मिष्किल वक्तव्य करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खसखस पिकवली.
'आपल्या पत्नी प्रतिभा यांना बारामतीकर गेल्या पन्नास वर्षांपासून ओळखतात. सहसा त्या कोणत्या कार्यक्रमात सहभाग घेत नाहीत. मात्र सराफी दुकानांच्या शुभारंभाला त्या आवर्जून जातात. धंद्यामध्ये त्यांच्या हाताला चांगलं यश मिळतं हे आपल्याला माहिती असतं, तर आपण राजकारणात आलोच नसतो', असं शरद पवार म्हणाले.
बारामतीतील 'चंदुकाका सराफ अँड सन्स' या सुवर्णपेढीचं उदघाटन शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
'आता धंदा करण्याचं वयदेखील राहिलं नाही, त्यामुळे जो कोणी बोलावेल तिथे जायचं इतकंच काम उरलं आहे.' असं सांगत शरद पवारांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. पत्नीच्या हाताला धंद्यात प्रचंड यश आहे, हे माहित असतं, तर आपण राजकारणात आलोच नसतो, असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement