एक्स्प्लोर

Pune-Saswad Crime: आमदारांनी पोलिसांवर दबाव आणून सासवडचे दुहेरी हत्याकांड दडपले होते; माजी राज्यमंत्री शिवतारेंचा आरोप

Pune-Saswad Crime: आमदारांनी पोलिसांवर दबाव आणून सासवडचे दुहेरी हत्याकांड दडपले होते, असा खळबळजनक आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.

Pune-Saswad Crime: सासवड येथील दुहेरी हत्याकांड प्रकरण पोलिसांवर दबाव आणून आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी दडपले होते, असे खळबळजनक दावा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला. महाराष्ट्रातील सासवडचा बिहार झाला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातील सगळ्यांचे फोन कॉल रेकॉर्ड चेक केले तर हत्याकांडाची खरी माहिती पुढे येईल, अशी मागणी  शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

नेमकं काय घडलं?
24मे रोजी सासवडमधील ताथेवाडीच्या कट्ट्यावर 4 कचरावेचक कामगार बसले होते. उन्हापासून शांतता मिळावी म्हणून कामगार विश्रांती घेत होते. या चार कामगारांना अंडाभूर्जी विक्रेत्याने या ठिकाणी का बसला? असा प्रश्न विचारत मारहाण केली आणि त्यांच्या अंगावर उकळते पाणीदेखील टाकले. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवाने या सगळ्यात 50 आणि 60 वर्षांच्या दोन पुरुषांचा मृत्यू झाला होता आणि साथीदार असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या सगळ्या घटनेच्या साक्षीदार असलेल्या लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम व शेवंताबाई जाधव यांच्यावरदेखील सध्या उपचार सुरु आहेत.

शवविच्छेदनात चुकीची माहिती दिली?
या सगळ्या प्रकारानंतर त्या दोन्ही मृत व्यक्तीचं शवविच्छेदन करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना हाताशी घेतलं आणि चुकीचा रिपोर्ट तयार केला. या दोघांचा मृत्यू उपासमारीने झाला आहे, असा चुकीचा रिपोर्ट देण्यात आला होता. कसलाही अधिक तपास न करता पोलीसांनी आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांनी फाईल बंद केली होती. मात्र काही नागरिकांनी मला आणि अधिक्षकांना या संदर्भात सगळी माहिती दिली. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आलं.

सासवडचा बिहार होत आहे

सासवड आणि जेजुरी परिसराता याआधी असं भीतीचं वातावरण कधीच नव्हतं. मात्र जेव्हापासून पोलिसांच्या कामकाजात आमदार आणि त्यांचे सहकारी हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे निष्पाप नागरिकांचं नुकसान होत आहे. त्यांच्या दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे.सासवड तालुक्यातील ही परिस्थिती चुकीची आहे. गरिबांचा निदान विचार किंवा त्यांना मदत करायची सोडून हे असले धक्कादायक प्रकार घडत आहे. त्यामुळे सासवडचा बिहार होत आहे, असंही शिवतारे यांनी म्हटलंय.


या सगळ्या प्रकरणासंदर्भात  शिवतारेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. त्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्याची घाई का केली?, 15 तास माणूस रस्त्याच्या कडेला तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिका पाठविण्यास नकार का दिला? शवविच्छेदन अहवालात शरीरावरील जखमांचा उल्लेख डॉक्टरने कुणाच्या दबावाखाली टाळला? जेजुरीला फ्रीझर असताना मृतदेह फ्रीझरमध्ये ठेऊन त्याची ओळख का पटवण्यात आली नाही?अवघ्या 24 तासात सासवड नगरपालिकेने मृतदेह जाळून का टाकला, असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले आहेत.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
Pune FDA Mahaprasad : गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
Maharashtra Rain News: गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Embed widget