(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Ravindra Dhangekar : मंत्री शंभूराज देसाईंवर केलेल्या आरोपांसंदर्भातील नोटीसीसंदर्भात धंगेकरांचं सडेतोड उत्तर म्हणाले, अजून नोटीस....
मला कुठलीही नोटीस प्राप्त झाली नाही मात्र मला नोटीस मिळाली तर मी कायदेशीर उत्तर देणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
पुणे : उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आणि उत्पादन शुल्क विभागावर आणि पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप यासाठी रवींद्र धंगेकरांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना याप्रकरणी नोटीस धाडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे. मात्र मला कुठलीही नोटीस प्राप्त झाली नाही मात्र मला नोटीस मिळाली तर मी कायदेशीर उत्तर देणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, उत्पादन शुल्क विभागाकडून मला अजून कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. जर मला नोटीस मिळाली तर मी त्यांना कायदेशीरपणे उत्तर देईन जर विधानसभेत माझ्याविरोधात हक्कभंग आणला तर माझ्याकडे इतके पुरावे आहेत की मी यांचा हक्क भंग करेन. पुण्यात पब संस्कृती वाढली त्याचे मंत्री शंभूराज देसाई आहेत. त्यांनी माझी काळजी करण्यापेक्षा पुणेकरांची काळजी करावी. पुण्यातील नागरिकांची काळजी करावी. पब बंद करा तर समाजाचं भलं होईल.
पुढे बोलताना ते म्हणाले की, उत्पादन शुल्क विभागात जाऊन पोलीस अधिकाऱ्याला धारेवर धरलं होतं. त्यांच्यासोर रेट कार्ड वाचून दाखवलं. हे सगळे हफ्ते पोलिसांना येतात. त्यामुळे हा सगळा प्रकार सुरु आहे. हे पोलिसांना येतात त्या पोलिसांवर कारवाई करण्यात येत नाही म्हणजेच सगळे मिळून हे हफ्ते घेतात हे स्पष्ट होतं.
या प्रकरणात पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांनी अपघाताच्या रात्री चुकीचा तापस केला त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्यानं पोलिसांनी डॉ. अजय तावरेंना अटक केली. त्यांची चौकशी केली जात आहे मात्र याच पोलिसांची कुठेही चौकशी करण्यात आली नाही. आपलं ते बाबा अन् दुसऱ्याचं ते कारटं, असं पोलिसांनी केलं. अजय तावरे चुकीचेच आहेत. मात्र पोलिसांनी चुकीचा तपास करुन प्रकरण वळवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. मी सगळ्या प्रकरणावर आवाज उठवतो म्हणून मला त्रास देणं आता सुरु झालं आहे. यापुढेही मला त्रास होत राहणार मात्र पुणेकरांनी आणि माझं पुणे नीट रहावं यासाठी मी त्रास सहन करायला तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-