एक्स्प्लोर

Pune Porsche Car Accident : डॉ. तावरेंच्या नियुक्तीला हसन मुश्रीफ जबाबदार, मी नाही; डॉ. विनायक काळेंची थेट कबुली

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आता नवनव्या (Pune Porsche Car Accident) लोकांची नावं पुढे येत आहे. ससून रुग्णालयाकडे संशयाची सुई असतानाच आता या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचं समोर आलं आहे.

पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आता नवनव्या (Pune Porsche Car Accident) लोकांची नावं पुढे येत आहे. ससून रुग्णालयाकडे संशयाची सुई असतानाच आता या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच डॉ. अजय तावरे याची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, अशी कबुली थेट ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंनी दिली. त्यानंतर थेट विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून ससूनच्या कारभारामध्ये राजकीय हस्तक्षेप दिसून येत आहे. त्यात आता या प्रकरणातदेखील राजकीय हस्तक्षेप असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या ससूनच्या कारभारातील राजकीय हस्तक्षेप कधी थांबणार किंवा या प्रकरणी सरकार ठोस भूमिका कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्ती संदर्भातदेखील त्यांनी मोठा खुलासा केला आहे. डॉ. तावरे यांच्या अधीक्षक पदाची नियुक्ती आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. तावरे हे त्यावेळी प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती करावी, असं पत्राद्वारे सांगितलं होतं. त्यानंतर तावरेंच्या नियुक्तीचा आदेश निघाला होता, असं काळेंनी थेट सांगितलं. हसन मुश्रीफांनी तावरेंना नियुक्ती दिली होती. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीला मी जबाबदार नाही, असं काळेंनी स्पष्ट केलं.

डॉ. अजय तावरे यांनी यापूर्वी ससूनमध्ये अनेक कारनामे केले आहे. मागील सतरा वर्षा कोणत्याना कोणत्या कारणावरुन ते चर्चेत आले. शिवाय त्यांची बदली करण्यात आली. तरीदेखील ते ससूनमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे परत आले. यावेळीदेखील त्यांनी राजकीय लोकांचा वापर करुन ससूनमध्ये नियुक्ती मिळवली होती. तावरेंचे कारनामे सरकारसाठी काही नवीन नाही आहे. ससूनमधील किडनी तस्करी प्रकरणातदेखील त्यांच्यावर आरोप झाले होते. तरीदेखील त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. 

अजय तावरे, श्रीहरी हरनोळ निलंबित; 'ससून'चे डीन विनायक काळे सुद्धा सक्तीच्या रजेवर

ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने निलंबन करण्यात आले आहे. शिवाय महत्वाचे म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे (Vinayak Kale) यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला.

इतर महत्वाची बातमी-

पुणे अपघात प्रकरणात बदलेले ब्लड सॅम्पल लाडोबाच्या आईचेच? लेकासाठी ढसाढसा रडणारी शिवानी अग्रवाल बेपत्ता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: बारामतीमधील सभेसाठी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: बारामतीमधील सभेसाठी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Sunetra Pawar : मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी, येसूबाई जशा लढल्या तशी लढेन; बारामतीच्या मैदानातून सुनेत्रा पवारांचा विश्वास
मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी, येसूबाई जशा लढल्या तशी लढेन; बारामतीच्या मैदानातून सुनेत्रा पवारांचा विश्वास
Jay Pawar: जयड्या रडायचं नाही लढायचं; जय पवारांचं भावूक भाषण, अजित दादांची आठवण, बारामतीकरांना 'लव्ह यु टू'
जयड्या रडायचं नाही लढायचं; जय पवारांचं भावूक भाषण, अजित दादांची आठवण, बारामतीकरांना 'लव्ह यु टू'

व्हिडीओ

Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण
Uddhav Thackeray Speech : आम्ही हिंदू!आमचे बुरखे काय फाडणार? उद्धव ठाकरेंचं मुंबईत रोखठोक भाषण
Supriya Sule speech Baramati : सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान होण्याचं संकट, जाणून घ्या
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय करावं?
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं

Embed widget