एक्स्प्लोर
चेन्नई-कुर्ला एक्स्प्रेसमधून 15 किलो सोन्याचे दागिने जप्त
पुणे : पुणे लोहमार्ग पोलिसांनी चेन्नई कुर्ला एक्सप्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या दोघा व्यक्तींकडून तब्बल तब्बल 15 किलो 650 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. या दागिन्यांची किंमत 4 कोटी 38 लाख रुपये इतकी आहे.
पुणे लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास केली.
याप्रकरणी सुमेर सिंह आणि हरिओम पारीक या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची अधिक चौकशी सुरू आहे. या दोघांजवळ संबंधित दागिन्यांचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नाहीत. त्यामुळे सीआरपीसी कलम 102 प्रमाणे दागिन्यांचा पंचनामा करून ताब्यात घेतले आहे. मूळ सोनेमालकास बोलावण्यात आले असून, त्यांनी हे सोने कुठून आणले आणि कुठे घेऊन जाणार असल्याबाबत चौकशी सुरू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement