Pune Porsche Car Accident :पुणे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट, त्या रात्री धनिकपुत्रासोबत पोर्शेत बसलेले मित्र पोलिसांच्या रडारवर, चौकशी होणार
अल्पवयीन मुलांच्या दोन मित्रांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. या दोन्ही मित्रांना पालकांसोबत पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं आहे.
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि अपघातावेळी गाडीत असलेल्या ड्रायव्हरचीदेखील चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता याच गाडीत उपस्थित असलेल्या दोन मित्रांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. या दोन्ही मित्रांना पालकांसोबत पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं आहे. यात हे सगळे कुठे गेले होते?, पार्टीत काय केलं? परत येताना नक्की कोण होतं?, गाडी कोण चालवत होतं? या सगळ्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.
ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी गाडीत अल्पवयीन मुलगा त्याचा ड्रायव्हर आणि दोन मित्र होते. पार्टी करुन तिघेरी परत येत होते. या प्रकरणात समोर आलेले काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते तिघेही पार्टी करताना दिसत आहेत आणि मद्यप्रशान करतानादेखील दिसत आहेत. आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा त्याच्या गाडीतील मित्रांची चौकशी का करण्यात आली नाही, ते दोघेही कुठे आहेत आणि त्यादोघांनाही का सोडण्यात आलं?, असे अनेक प्रश्न विचारले जात होते. या दोघांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे आणि या दोन्ही मित्रांना चौकशी करण्यात येणार आहे.
पोलिसांचीदेखील चौकशी होणार
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आता पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी होणार आहे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत पोलीस आयुक्तांच्या मार्फत नेमण्यात आलेली पोलिसांची समिती येरवडा पोलिसांची चौकशी करेल दोन-दोन एफआयआरची नोंदणी का करण्यात आली यासंदर्भात कोणी दबाव आणलेला का त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी नेमकी कधी झाली सोयाबीनचा तपास या पथकाच्या माध्यमातून केला जाईल.
या प्रकरणात अल्पवयीन मुलाला 15 तासात जामीन मंजूर केल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाला राजकीय वळण आलं होतं. अनेक विरोधकांकडून आरोप करण्यात आले. या मुलाला कोण वाचवतंय?, याची चौकशी व्हायला हवी, अशा मागण्या करण्यात आल्या. संजय राऊत, रवींद्र धंगेकर पासून तर थेट राहुल गांधींपर्यंत अनेकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उडवली अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुण्यात हजेरी लावून वरिष्ठा पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली आणि पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.
इतर महत्वाची बातमी-