एक्स्प्लोर

Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकण्यासाठी विशाल अग्रवालने किती लाख मोजले? आकडा समोर, वडगाव शेरीतून पैसे घेऊन येणारा अटकेत

Pune Porsche Car Accident : पहिल्यांदा या प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता ते थेट ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल बदलून कचऱ्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Porsche Car Accident :पुण्यातील कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री भरधाव पोर्श कारखाली दोघांना चिडून मारल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवालने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी केलेल्या कारनाम्यांचा उलघडा आता होऊ लागला आहे. पोलिस तपासामध्ये दिवसागणिक अग्रवाल फॅमिलीने केलेल्या कृष्णकृत्यांचा आता भांडाफोड होत आहे. पहिल्यांदा या प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता ते थेट ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल बदलून कचऱ्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयाचा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी पैशाच्या बदल्यात ब्लड सॅम्पल बदलून कचऱ्यात फेकून दिल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. त्यामुळे ससून रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. इतकेच नव्हे, तर हा ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये जाण्यासाठी विशाल अग्रवालने अजय तावरेशी संपर्क केल्याचे तांत्रिक पुराव्यातून उघड झालं आहे. आता या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 

विशाल अग्रवाल आणि डॉक्टरांमध्ये पैशांची दिवाण-घेवाण

ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये जाण्यासाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टरांमध्ये पैशांचे दिवाण-घेवाण सुद्धा झाली होती. वडगाव शेरीतून 3 लाख रुपये स्विफ्ट कारमधून घेऊन येणाऱ्या ससूनमधील शिपायाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. अमित घटकांबळे असं त्याचं नाव असून तो ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन विभागामध्ये शिपाई म्हणून काम करतो. त्यामुळे पैशांच्या बदल्यांमध्ये ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल थेट कचऱ्यामध्ये टाकून दिल्याचे स्पष्ट झालं आहे. 

अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल रिपोर्ट मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अपघात घडल्यानंतर येरवडा पोलिस स्टेशनमध्ये पहिल्या दिवशी घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुद्धा पुणे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. या प्रकरणात देशव्यापी संताप उसळून आल्यानंतरपुणे पोलिसांनी या प्रकरणात तपासाचे सूत्रे फिरवली होती. यानंतर अग्रवाल फॅमिलीमधील विशाल आणि सुरेंद्र कुमारच्या अटकेची कारवाई झाली होती. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDaryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget