एक्स्प्लोर

Pune Police : पुणे पोलीस आयुक्तांची धडक कारवाई; आणखी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन

पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन करण्यात आलं आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या निलंबनानंतर आता वारजे पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आलं आहे. 

Pune Police : दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव (Pune Police) पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलीस चांगलेच अॅक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात जणांचे निलंबन करण्यात आलं आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या निलंबनानंतर आता वारजे पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आलं आहे. 

कामामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या तसेच कर्तव्य न पार पाडणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांना पुणे पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु सायप्पा हाके, पोलीस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलीस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलीस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर, पोलीस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलीस नाईक सचिन संभाजी कुदळे यांचे निलंबन करण्यात आलं आहे. योग्यरित्या मोक्का कारवाई केली नाही, परिसरातील दारुची दुकानं बंद केली नाहीत, अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, आरोपींविरोधात कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे या सगळ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Pune Police : दोन दिवसांपूर्वी सात जणांचं निलंबन

यापूर्वी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आलं होतं. यापूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी बाकी सगळ्या पोलिसांची चौकशी केली त्यानंतर आणखी सात जणांवर कारवाई केली आहे.

यापूर्वी सावळाराम साळगावकर, मनोज एकनाथ शेंडगे, समीर विठ्ठल शेंडे, हसन मकबुल मुलाणी, मारुती गोविंद वाघमारे, संदीप जयराम पोटकुले आणि विनायक दत्तात्रय जांभळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. 

Pune Police : पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; पोलिसांनाही कडक सूचना...

पुण्यात वाढती गुन्हेगारी पाहता अनेक पुणेकरांनी पुणे पोलीस नक्की काय करत आहेत?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्यानंतर पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हते त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच संतापले होते. त्यानंतर आता पुण्यातील पोलिसांवर देखील कारवाई होणार आहे. दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर पुण्यातील इतर पोलिसांवरही आयुक्तांची करडी नजर असणार आहे. त्यांना आयुक्तांनी कठोर सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात कसूर आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget