एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'लालबागच्या राजा'नंतर पुण्याच्या 'दगडूशेठ गणपती'लाही गंडा
गणेशोत्सवाच्या 12 दिवसांमध्ये जवळपास साडेतीन कोटींचं रोख दान भाविकांकडून जमा करण्यात आलं आहे. परंतु इथंही काही भाविकांनी आपल्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा खपवल्या.
पुणे : 'देते है भगवान को धोखा, इन्सान को क्या छोडेंगे' या गाण्यातील ओळींचा प्रत्यय गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा एकदा आला आहे. 'लालबागच्या राजा' पाठोपाठ पुण्यातल्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीलाही भक्तांनी जुन्या नोटा देऊन 'गंडवलं' आहे.
गणेशोत्सवाच्या 12 दिवसांमध्ये जवळपास साडेतीन कोटींचं रोख दान भाविकांकडून जमा करण्यात आलं आहे. परंतु इथंही काही भाविकांनी आपल्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा खपवल्या. नोटाबंदी होऊन येत्या नोव्हेंबरमध्ये वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अजूनही लोकांकडे पाचशे-हजाराच्या नोटा असल्याचं उघड झालं आहे.
लालबागच्या राजाच्या दागिन्यांच्या लिलावाला भक्तांचा मोठा प्रतिसाद
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी तब्बल 25 हजार रुपयांच्या जुन्या नोटा दान स्वरुपात आल्या आहेत. सोनं-चांदीपासून आलेल्या, इतर दानरुपी वस्तूंची मोजमाप अद्याप करण्यात आलेली नाही.रांगेत उभं राहून लालबागच्या राजाला फसवलं, दान पेटीत हजाराच्या जुन्या नोटा!
लालबागच्या राजा गणपतीच्या दानपेटीत, रद्द झालेल्या हजाराच्या 110 जुन्या नोटा सापडल्या आहेत. या नोटांचं मूल्य थोडंथोडकं नाही तर तब्बल 1 लाख 10 हजार रुपये आहे. म्हणजेच या 110 नोटा आहेत. 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात, लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार जुन्या हजारांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement