एक्स्प्लोर

Pune News : आरोपीचा प्लॅन फेल! औषधांच्या नावाखाली अवैध मद्याची वाहतूक; 57 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या वतीने मुळशी तालुक्यातील मौजे माले गावाच्या परिसरात हॉटेल लाल मिर्चच्यासमोर पुणे माणगाव हायवे रोडवर धडक कारवाई केली आहे.

Pune News : मागील काही दिवसांपासून (Pune Crime news) राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) विभागाने पुणे जिल्ह्यात (Crime News) कारवाईचा धडाका लावला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने मुळशी तालुक्यातील मौजे माले गावाच्या परिसरात हॉटेल लाल मिर्चच्यासमोर पुणे-माणगाव (Pune-mangaon highway) हायवेवर धडक कारवाई  केली आहे. या कारवाईत तब्बल 57 लाख 25 हजार 520 रुपयांचं बेकायदेशीर मद्य जप्त केलं आहे.

या प्रकरणी दानाराम चुनाराम नेहरा, रुखमनाराम खेताराम गोदरा या दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ), (ई), 80, 81, 83, 90, 103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषधे आणि इंजेक्शन असल्याची बतावणी, पण प्रत्यक्षात बेकायदेशीर मद्य

राज्य उत्पादन शुल्क यांना मिळालेल्या गोपनीय महितीनुसार राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने गोवा राज्यात विक्री करता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. गोवा राज्य निर्मित मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने मोहीम राबवली. मिळालेल्या खात्रीशीर महितीनुसार पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मौजे माले गावचे हद्दीत हॉटेल लाल मिर्चच्यासमोर पुणे-माणगाव हायवेवर संशयित ट्रकची चौकशी करत असताना सहा चाकी ट्रक थांबवून वाहन चालकाकडे वाहनामध्ये काय आहे? याबाबत चौकशी केली. यावेळी वाहन चालकाने त्यामध्ये औषधे आणि इंजेक्शन असल्याचं सांगितलं. परंतु त्याने संशयास्पद उत्तर दिल्याने वाहन रस्त्याच्या बाजूस घेऊन तपासणी केली असता बेकायदेशीर मद्य आढळून आलं.

कारवाईचा धडाका सुरुच

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून पुण्यात कारवाईचा धडाका सुरु ठेवला आहे. यापूर्वी पुण्याजवळ असलेल्या तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत 87 लाख 89 हजार 520 रुपये किंमतीचे विदेशी मद्य (Foreign Liquor) जप्त केलं होतं. त्यासोबतच एकूण 1 कोटी 5 लाख 7 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील मागील सहा महिन्यातील आजची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय 24 वर्षे) आणि देविदास विकास भोसले  (वय 29 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं होती.  

हेही वाचा

Pune-Solapur Accident : ढाब्यावर जेवण करुन प्रवासी पुढच्या प्रवासासाठी निघाले अन् रस्त्यातच बस पलटली; 11-12 जण गंभीर जखमी
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सIran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?Zero Hour Varanasi Sai Baba Idol : वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंVaranasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
Embed widget