एक्स्प्लोर

Savitribai Phule Pune University : विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोफत बस सेवा सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) परिसरात ये-जा करण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) परिसरात ये-जा करण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी 10:30 वाजतापासून सुरू होणारी ही सेवा विद्यापीठ परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांना पोहचण्यात मदत करणार आहे. यामुळे विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

विद्यापीठाचा परिसरात मोठा असल्याने स्वतःचे वाहन नसलेल्या विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी विद्यापीठातर्फे दोन बसेसे देण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून ही सेवा उपलब्ध असून विद्यापीठाच्या सर्व प्रमुख विभाग आणि कार्यालयासमोर जवळपास 13 बस थांबे सुरू करण्यात आले आहे. भविष्यात विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रतिसाद बघता थांब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी यासंदर्भात फलकही लावण्यात येणार आहेत. याशिवाय येत्या काळात बससेवेसाठी स्वतंत्र उपयोजन (ॲप्लिकेशन) विकसित करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे नियोजन आहे.

बसचे थांबे कोणते असतील?

विद्यापीठाचा मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र (जयकर ग्रंथालय), रसायनशास्त्र विभाग, परिक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतीगृह, आरोग्य केंद्र, पुंबा, मुलांचे वसतीगृह, मुख्य प्रेवशद्वार. 

बसचे वेळापत्रक कसे असेल?

सकाळी 10:30 पासून दर अर्ध्या तासाला ही बस चालणार आहे.  

या सेवेमुळे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना निश्चित मदत होणार आहे. हा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे अॅप तयार केले जाणार आहे. ज्यामुळे बस नेमकी कुठे आहे, किती वेळात कोणत्या थांब्यावर पोहचेल यांची माहिती वापरकर्त्यांना मिळेल, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी सांगितलं.

विद्यापीठात आल्यावर विद्यार्थी, नागरिकांना आधी खुप पायपीट करावी लागायची. मात्र प्रशासनाने दोन सीएनजी बसेसे पुरवून ही सेवा सुरू केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. या इको-फ्रेंडली सेवेचा जास्तीत जास्त लोकांना उपभोग घेता येईल यासाठी भविष्यात यात आणखी चांगले बदल करण्यात येईल, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी सांगितलं आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुण्यातील धक्कादायक घटना, मस्करीत मित्राच्या गुदद्वाराला पाईप लावून शरीरात भरली हवा, 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सElection Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...Raj Thackeray Anand Dighe : राज ठाकरे थोड्याच वेळात ठाण्यात, आनंदाश्रमात स्वागतची जय्यत तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
Embed widget