एक्स्प्लोर

पुण्यात सलीम अली पक्षी अभयारण्य धोक्यात

पुण्याभोवतालच्या टेकड्या गिळंकृत केल्यानंतर आता या अभयारण्याचे लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहे.

पुणे : पुणे शहाराच्या मधोमध मुठा नदीच्या काठावर असलेले सलीम अली पक्षी अभयारण्य इथं आढळणाऱ्या देशी - विदेशी पक्षांसाठी ओळखलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून रस्त्याने होणारी अतिक्रमणं आणि महापालिकेकडून त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळं पुण्याचं फुफ्फुस म्हणवणारं हे अभयारण्य धोक्यात आलं आहे.   

पुणे शहराच्या अगदी मधोमध  घनदाट जंगल टिकून असून पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. मुठा नदीच्या काठावरील  22 एकरांच्या या हिरव्या पट्ट्यात शेकाट्या, तांबट, नदी सुरय, राखी बगळा, कोतवाल, सातभाई, पारवा, पोपट लालबुड्या बुलबुल, पोपट असे देशी आणि युरेशियन स्पुनबिल, कॉमन तिल , नॉर्दर्न पाइंन्टेल , गर्गनेई असे अनेक विदेशी पक्षी आढळतात . शिवाय शेजारच्या मुठा नदीतही हळदी - कुंकू, टिबुकली, गायबगळा, खंड्या, धोबी, टिटवी  अशा पाणथळ भागात राहणाऱ्या पक्षांचा किलबिलाट सुरु असतो . मात्र आता हे सगळं धोक्यात आले आहे. कारण दररोज इथं ट्रक भरभरून राडा रोडा टाकला जात आहे. त्यामुळं मुठा नदीचं पात्र येथे तब्ब्ल वीस ते बावीस फूट उंच उचललं गेलंय. त्याचा परिणाम या नदीकाठावर आढळणाऱ्या झाडांवर आणि पक्षांवर तर होत आहे. शिवाय पावसाळ्यात पुराचा धोकाही त्यामुळं निर्माण झालय.

 देशी - विदेशी अशा एकशे तीसहून अधिक पक्षांचा  अधिवास असल्यानं अनेक पक्षीनिरीक्षक येथे पक्षी निरीक्षणासाठी येत असतात. पण दिवसेंदिवस इथं होणाऱ्या अतिक्रमणांमुळे आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे हे पक्षीही दिसेनासे झाले आहेत. मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पक्षांमुळे उद्योजक वाडिया कुटुंबीयांनी सत्तरच्या दशकात ही जमीन पक्षी अभयारण्यासाठी महापालिकेला दान केली .  पण पुणे महापालिकेला हा ठेवा जपता आलेला नाही . बिल्डरांकडून होणारी अतिक्रमणं आणि राडा रोड्यासह कचराही इथं मोठ्या प्रमाणात टाकण्यात येतोय . महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याने आता राज्याचे पर्यावरण मांत्री आदित्य ठाकरेंनी यामध्ये लक्ष घालूनही जागा वनविभागाकडे सोपवावी अशी मागणी होत आहे 

 वेगाने वाढणाऱ्या पुण्यातील हिरवळ तेवढ्याच वेगाने कमी होत गेली आहे. पुण्याभोवतालच्या टेकड्या गिळंकृत केल्यानंतर आता या अभयारण्याचे लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहे.  ते वेळीच रोखले नाहीत तर पुण्याचं हे वैभव इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्त्वाच्या बातम्या :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
Embed widget