Pune Ola, Uber : ओला, उबेरला ‘आरटीए’ धक्का; वाहतूक परवाना पुणे ‘आरटीए’ने फेटाळला!
ओला , उबरचा वाहतूक करणाऱ्यांना ‘आरटीए’ धक्का दिला आहे. ओला, उबरचा वाहतूक परवाना पुण्यात ‘आरटीए’ने फेटाळला आहे. या विरोधात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.
पुणे : ओला (OLA), उबरचा ( Uber ) वाहतूक करणाऱ्यांना ‘आरटीए’ (Pune Regional Transport Authority)धक्का दिला आहे. ओला, उबरचा वाहतूक परवाना पुण्यात ‘आरटीए’ने फेटाळला आहे. या विरोधात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. परवाना पुण्यात ‘आरटीए’ने फेटाळला असला तरीही प्रवासी वाहतूक सुरू ठेवता येणार आहे. शहरातंर्गत प्रवासी वाहतुकीसाठी ॲग्रीगेटरचा परवाना मिळावा, यासाठी ओला आणि उबर या कॅब कंपन्यांनी केलेला अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) फेटाळला. या निर्णयाच्या विरोधात दोन्ही कॅब कंपन्यांना 30दिवसांत राज्य वाहतूक प्राधिकरनाकडे अपिल करता येणार आहे. सेंट्रल मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर पॉलिसी 2020 अंतर्गत पार्टनर कॅब चालकांचा आरोग्य विमा काढणे, त्यांचा जीवनविमा काढणे, त्यांना नियमितपणे प्रशिक्षण देणे, कॅबचालकांना सलग 12 तासांनंतर त्यांना वाहतूक करता येणार नाही.यासाठी तांत्रिक बंधन घालणे या विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही कॅब कंपन्यांचा ॲग्रीगेटरचा परवाना मिळावा, यासाठीचा अर्ज फेटाळला आहे.
गाईटलाईन्स पाळले नाहीत!
रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालय दिल्ली यांचे मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स 2020 अन्वये में. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. आणि में. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. यांचे चारचाकी हलक्या वाहनांकरिता अॅग्रीगेटर लायसन्स मिळण्यासाठीचे अर्ज त्रुटींची पूर्तता करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे प्रलंबित होते. दोन्ही अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर 11 मार्च 2024 रोजीच्या बैठकीत पुनर्विलोकनानंतर उचित निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स, 2020 मधील तरतूदीची पूर्ण पूर्तता करीत नाहीत असे पुनर्विलोकनात आढळून आल्याने दोन्ही अर्ज नाकारण्यात आले.
प्रवासी वाहतूक सुरू राहणार!
पुण्यासह इतर शहरातदेखील ओला, उबेर टॅक्सी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. अनेकांना ही टॅक्सी सोयीची ठरते. त्यामुळे अनेकजण ओला- उबेर टॅक्सीवा प्राधान्य देत असतात. शहरात 75 टक्के लोक ओला उबेरचा वारत करतात. त्यासोबतच बाकी काही 5 कंपन्यांकडून ही ओला- उबेरसारखी सेवा पुरवली जाते. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकरचा परवाना काढण्यासाठी आरटीएकडे अर्ज केला नसल्याचं दिसून आलं आहे. ओला उबेर चालकांचा परवाना जरी आरटीएने फेटाळला असला तरीही प्रवाशांची मात्र गैरसोय होणार नाही आहे. अपील 30 दिवसांची मुदत देण्यात आहे. या 30 दिवसांत ओला उबेरची सेवा मात्र सुरु असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
-आता घरबसल्या मिळणार गायी- म्हशी, करोडो रुपयांचं पॅकेज सोडून तरुणांनी सुरु केला अनोखा व्यवसाय