![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune PMPML News : PMPML कडून शिवभक्तांना खास भेट; शिवजयंतीला जुन्नरसाठी एक्स्ट्रा बसेस
17 ते 19 फेब्रुवारी 202असे तीन दिवस पीएमपीएमएलने भोसरी ते जुन्नर दरम्यान भाविकांची ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे.
![Pune PMPML News : PMPML कडून शिवभक्तांना खास भेट; शिवजयंतीला जुन्नरसाठी एक्स्ट्रा बसेस Pune News PMPML to provide special bus services for Shiv Jayanti know details Pune PMPML News : PMPML कडून शिवभक्तांना खास भेट; शिवजयंतीला जुन्नरसाठी एक्स्ट्रा बसेस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/16/cd9fbc3cb7437b939ce6c35138dbd8351708066578106442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर (Shiv Jayanti) शिवजयंती निमित्त राज्यभरातून शिवभत्त येतात. येथे 19 फेब्रुवारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. (shivneri fort) या प्रसंगाचे महत्त्व आणि पर्यटकांचा (Pune PMPML News) ओघ लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML Bus) या ऐतिहासिक स्थळावर ये-जा करण्याचा प्रवास शक्य तितका सुरळीत व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे. 17 ते 19 फेब्रुवारी 202असे तीन दिवस पीएमपीएमएलने भोसरी ते जुन्नर दरम्यान भाविकांची ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे.
भोसरी ते जुन्नर प्रवासासाठी 05:30, 07:00, 08:30, 10:00, 13:30, 15:00, 16:30 आणि 18:00 आणि जुन्नर ते भोसरी प्रवासासाठी 09:30, 11:00, 12:30, 14:00, 17:30, 19:00, 20:00 आणि 22:00 या वेळेत सुटण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.जुन्नर ते भोसरी बस सुटण्याची वेळ 09.30, 11.00, 12.30, 02.00, 05.30, 07.00, 08.30, 10.00. असेल. PMPML ने केलेल्या या सोयीमुळे अनेक शिवभक्त सहज शिवनेरीवर शिवजयंती साजरी करु शकणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात 17 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत (Pune News) छत्रपती शिवाजी महाराज (Shiv Jayanti) यांच्या 394व्या जयंतीनिमित्त राज्याचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 'चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, क्वाड बायकिंग, पेंटबॉल, तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग, वॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव, कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्रि मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंद अनुभवता येणार आहेत. विविध किल्ल्यांची चढाई करत स्वत:ला आव्हान द्यावे - किल्ले हडसर, निमगिरी - हनुमंतगड, नाणेघाटासोबत जिवधनगड, कुकडेश्वर मंदिरासोबत चावंडगड. दोन दिवसीय गिर्यारोहण स्पर्धेत सहभागी व्हावे, कँपिंगसोबत हरिश्चंद्रगड ट्रेक आणि हडपसर - निमगिरी - हनुमंतगड - नाणेघाट - जिवधन येथे गिर्यारोहण हा उपक्रम देखील आयोजित केला आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)