एक्स्प्लोर

Pune Police Helmet : पुण्यात पोलिसांना हेल्मेट सक्ती: हेल्मेट न वापरल्यास थेट कारवाई होणार

दुचाकीस्वार पुणे पोलीस कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. हेल्मेट घालून न दिसल्यास थेट पोलिसांवरही कारवाई होणार आहे, असे आदेश नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. 

पुणे : पुण्यात सध्या वाहतुकीचे नियम कडक (Pune Traffic Rules)करण्यात येत आहे. त्यातच पुण्यातील पोलिसांना (Pune Police) हेल्मेट सक्ती(Helmet) करण्यात आली आहे.  दुचाकीस्वार पुणे पोलीस कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. हेल्मेट घालून न दिसल्यास थेट पोलिसांवरही कारवाई होणार आहे, असे आदेश नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार (PUNE CP Amitesh Kumar) यांनी दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस दलातील कर्मचारी विनाहेल्मेट शहरात फिरत असल्याचे फोटो माध्यमांनी छापून आणले होते. त्यानंतर सगळे नियम हे सर्वसामान्यांसाठीच आहे का?, असा सूर साधारण पुण्यातील नागरिकांकडून ऐकायला मिळाला. त्यानंतर पुणे पोलिसांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे आणि कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनाही हेल्मेटचा दंड भरावा लागणार आहे. 

नवनियुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी पदभार स्विकारल्यावरच थेट हेल्मेट संदर्भात जनजागृती करु, असं सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवस त्यांनी हेल्मेट सक्ती संदर्भात जनजागृती केली मात्र पुणे पोलिसच हेल्मेट वापरत नसल्याचं समोर आलं आणि त्यांनी थेट आदेश काढले. 

पुणेकरांसाठी अजून हेल्मेट सक्ती करण्यात आली नाही. शहरात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे त्यात रोज अनेकांचा जीव अपघातामुळे जात आहे. त्यामुळे पुण्यात हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी पुणेकरांसाठी हेल्मेट सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. 

मागील वर्षाचा आकडा पाहिला तर पुण्यात 4 लाख पुणेकरांवर हेल्मेटसाठी कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून साधारण 36 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यासोबतच पुण्यातील अनेक मोठ्या कंपन्यांना नोटीसा पाठवून त्यांच्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्याचे आदेश दिले आहेत आणि शहरात हेल्मेट न वापरणाऱ्यांवर सीसीटीव्हीमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. 

अमितेश कुमारांचे धडाधड आदेश

पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी पदभार स्विकारल्यानंतर दोनच दिवसांत कुख्यांत गुंडांना एकत्र बोलून त्यांची परेड काढली. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांना तंबी दिली होती. त्यासोबतच पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी गुंडाना सज्जड दम दिला होता. गुन्हेगारी पसरवायची नाही, रिल्स व्हायरल करायचे नाही, अशा कडक शब्दांत सूचना दिल्या होत्या. 

इतर महत्वाची बातमी-

Nagpur Crime : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणाला नवं वळण, घटनेच्या वेळी आणखी दोन जण होते? फॉरेन्सिक तपासणीत उघड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीतीAmol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभारEknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget