(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sasoon Hospital Drug Racket: ... तर मला वाकड्यात शिरावे लागेल; आमदार रवींद्र धंगेकर ससूनच्या डीनवर चांगलेच भडकले, नेमकं काय घडलं?
ससून रुग्णालयाचीत ड्रग्स रॅकेट प्रकरणी कसबा मतदारसंघातील आमदार रवींद्र धंगेकरयांनी ससून रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
पुणे : ससून रुग्णालयाचीत ड्रग्स रॅकेट (Sasoon Hospital Drug Racket) प्रकरणी कसबा मतदारसंघातील आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. धंगेकरांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आमदार धंगेकर यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना ठाकूर यांची चांगलीच तारांबळ उडाल्याची बघायला मिळाले. धंगेकर यांनी ससूनचा कारभार असाच सुरु राहिला तर मात्र मला वाकड्यात शिरावं लागेल, अशा शब्दात खडेबोल सुनावले आहेत.
ससून रुग्णणालयातून ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर पुणे पोलीसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर आमदार धंगेकर यांनी ससून रुग्णालयात भेट दिली. त्यांनी कैद्यांच्या वार्डचीदेखील पाहणी केली.
'या सगळ्या कैद्यासंदर्भात कोर्टाने दिलेले कागदपत्र आम्हाला दाखवा. चार्जशीटवर काय लिहिलंय तेही दाखवा', असं म्हणत धंगेकरांनी संजीव कुमार यांना चांगलंच फटकारल्याचं दिसत आहे. त्यात संजीव कुमार यांच्याकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने धंगेकर चांगलेच भडकले होते. तुम्हाला कैद्यांसंदर्भात प्राथमिक माहिती आणि उपचार माहिती नसेल तर माफी मिळणार नाही. तुम्ही प्रमुख आहात. डीन म्हणून रुग्णालयातील सर्व बाबी तुम्हाला माहिती असायला हव्यात. आम्हाला सगळ्यांना फिरवण्याचा प्रयत्न करु नका. रुग्णालयात चालेला कारभार सगळ्यांना कळला पाहिजे, अशा शब्दांत धंगेकरांनी डीन यांना खडेबोल सुनावलं आहे.
संजीव ठाकूर काय म्हणाले?
धंगेकर यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं संजीव ठाकूर हे देऊ शकले नाही. त्यानंतर त्यांनी कैद्यांच्या वार्डसंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्या अहवालात कुठेही या ससूनच्या कैद्यांच्या वार्डसंदर्भात माहिती दिलेली नाही. त्यावरुन पत्रकारांनीदेखील त्यांना धारेवर धरलं मात्र ठाकूर यांनी या सगळ्या प्रकरणावर थेट भाष्य करणं टाळलं. त्याचवेळी रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात मी माहिती देऊ शकतो मात्र तो कसा पळाला आणि कुठे गेला, यासंदर्भात मी कोणतंही भाष्य करु शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचं हे रुप पाहून या प्रकरणात ललित पाटीलला नेमका कोणाचा पाठिंबा आहे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
इतर महत्वाची बातमी-