Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE
![Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/23/a871d1f84d5681da2e722d84c2dfbff0_original.png)
Background
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराववर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
कोंढव्यात हुक्का गोडावूनवर पोलिसांचा छापा; 22 लाखाचा मुद्देमाल जप्त
मुंढवा पोलिसांनी येवलेवाडी परिसरातील एका हुक्का गोडावूनवर छापा मारून कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी 22 लाख 17 हजार रुपये किंमतीचा हुक्का आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या ठिकाणाहून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शहेजाद अश्रफ रंगूनवाला (वय 37), नवेद मुंने खान (वय 21) आणि शरीफ मोहम्मद मालापुरी (वय 18) या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2018 चे कलम 4 अ 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीचे मुख्य उपसंपादक राजेंद्र येवलेकर यांची आत्महत्या
लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीचे मुख्य उपसंपादक राजेंद्र येवलेकर यांनी कोथरुडमधील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजेंद्र येवलेकर विज्ञान विषयक लिखाणासाठी ओळखले जात. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि तीन भाऊ आहेत. राजेंद्र येवलेकर यांनी आत्महत्या का केली हे मात्र अजुन समजु शकलेले नाही. कोथरुड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)