Hemant Patil : कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याला धमकी; शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार
शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. हेमंत पाटील यांनी कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे : खासदार, आमदार आणि मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना विविध (Pune News) कामांसाठी धमक्या दिल्याच्या बातम्या यापूर्वी आपण पाहिल्या आहे. अशीच एक बातमी आता समोर आली आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (hemant patil) यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार अर्ज दाखल (Pune Police) करण्यात आला आहे. हेमंत पाटील यांनी कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याला धमकी दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात थेट तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. कृषी आयुक्तालयातील सहसंचालकाला हेमंत पाटील यांनी धमकी दिली आहे. आहे. जीवाला हानी पोहोचवत कार्यालयाची तोडफोड करण्याची अधिकाऱ्याला धमकी दिली आहे.
कृषी आयुक्तालयातील विनयकुमार आवटे यांनी हेमंत पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. विनयकुमार आवटे हे कृषी सहसंचालक पदावर विस्तार आणि प्रशिक्षण यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे राज्यातील पीकविमा योजनेचे काम असून या संदर्भाने विविध स्तरावर शेतकरी, लोकप्रतिनिधी शासनास व व्यक्तिगतरित्या आवटे यांच्याकडे संपर्क करीत असतात. मुंबईत कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पिक विमा संदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीला हेमंत पाटील आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर हेमंत पाटील यांनी आवटे यांना बोलवलं आणि कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसमोर धमकी दिल्याचं तक्रार अर्जात नमूद करण्यात आलं आहे.
योग्य कारवाई करण्याची मागणी
शासनाच्या अत्यंत महत्वाच्या आणि शेतकऱ्यांशी निगडीत योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान त्या योजनेच्या राज्यस्तरावरील अधिकाऱ्याने त्याला होणारी संभाव्य शारीरिक इजा आणि झालेला मानसिक त्रास याबाबत सांगितलं. हे पाहून त्यांनी धमकावलं आहे. पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करणे व तंगडी तोडणे वगैरे स्वरुपाची धमकी दिल्याचे नमूद केलं आहे. या प्रकरणी खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी आवटे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा दिला होता...
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला होता. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदारकीचा राजीनामा देणारे ते पहिले खासदार होते. परंतु संसदेत समाजाचे प्रश्न मांडा, असे सांगत लोकसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा फेटाळला होता.
इतर महत्वाची बातमी-