पुण्यातील वानवडीत 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, सात नराधमांना अटक
पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 14 वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दिली आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
पुणे : पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 14 वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दिली आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी 31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात आली होती. रात्री तिला आरोपींनी आता गाडी नाही. गावी कशी जाणार असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून बाहेर आणले. तिचे अपहरण करून तिला वानवडी परिसरात नेले. त्या ठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार केला. तसेच, दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण सात आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.
घटनाक्रम
- 31 तारखेला गावी जाण्यासाठी मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती.
- मात्र आता रात्री गाडी नसून तुझ्या राहण्याची व्यवस्था करतो असे सांगून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेतले.
- वानवडी येथे नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तिला फिरवलं
- आधी सहा रिक्षाचालक या बलात्कारात सहभागी होते. तसेच तिला तिथेच डांबून ठेवण्यात आल्याने एक सप्टेंबरला पुन्हा रेल्वेचे कर्मचारी असलेल्या दोन चतुर्थश्रेणी कामगारांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.
- पीडित अल्पवयीन मुलगी ही रुग्णालयात असून सध्या तिची परिस्थिती गंभीर परंतु स्थिर आहे
- पीडित मुलगी इयता सातवीमध्ये शिकत आहे
- तिच्या वडिलांनी मिसिंग तक्रार दाखल केली
- पाच दिवस बलात्कार करत होते
- आठ आरोपी अटकेत असून इतरांचा शोध सुरू
- 10 दिवसाची पोलीस कोठडी
हा प्रकार काल उघडकीस आला आहे. त्यानंतर वानवडी पोलीसांनी तात्काळ या आरोपींचा शोध घेत त्यांना अटक देखील केली आहे. त्यावेळी यात दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. तर, इतर रिक्षा चालक आहेत. दरम्यान, त्यांना सहाय्य करणाऱ्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये 6 रिक्षा चालक आणि रेल्वेचे दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत.