Pune News: सर्वसामान्यांसाठी खुली होणार सीएसआयआर-एनसीएल; तुम्हालाही पाहता येईल, जाणून घ्या कसं?
Pune News: जागा मर्यादित उपलब्ध असल्याने या कार्यक्रमांना हजेरी लावायची असल्यास एनसीएलच्या वेबसाईटवर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
![Pune News: सर्वसामान्यांसाठी खुली होणार सीएसआयआर-एनसीएल; तुम्हालाही पाहता येईल, जाणून घ्या कसं? Pune News CSIR-NCL will be open to general public Pune News: सर्वसामान्यांसाठी खुली होणार सीएसआयआर-एनसीएल; तुम्हालाही पाहता येईल, जाणून घ्या कसं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/ae272803d85ddc5b01a0a673b877773a168371322096189_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: केंद्राची पुण्यातील नावाजलेल्या संशोधनात्मक संस्थापैकी एक असलेल्या सीएसआयआर-एनसीएलला (CSIR- NCL) सर्वसामान्यांना भेट देता येणार आहे. सीएसआयआर - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या केंद्रीय संशोधन संस्थेकडून 22 ते 27 मे या कालावधीत ‘वन वीक, वन लॅब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सहा दिवसांच्या या कार्यक्रमात प्रयोगशाळेनं केलेल्या अत्याधुनिक संशोधन प्रदर्शित करण्यात येणार आहे. या आधारे सीएसआयआर-एनसीएल या संस्थेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जागा मर्यादित उपलब्ध असल्याने या कार्यक्रमांना हजेरी लावायची असल्यास एनसीएलच्या वेबसाईटवर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद, स्टार्टअप एक्स्पो, कौशल्य विकास कार्यक्रम, ओपन डे, विज्ञान प्रदर्शनासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसंच संशोधन विद्यार्थ्यांचा एक गट अवेक्षण नामक एक विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण देखील करणार आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली असून सीएसआयआरच्या प्रयोगशाळांच्या तंत्रज्ञानातील प्रगती आणि नवकल्पना समोर आणण्याचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. एनसीएलच्या कामांवर देखील प्रकाश टाकल्या जाणार असून स्वच्छ ऊर्जा, अर्थव्यवस्था, शाश्वत रासायनिक उद्योग, जैव उपचार पद्धती, केमिस्ट्री, बायोमास आणिकृषि तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
पुढील सहादिवस हायड्रोजनच्या उपयोजनात्मक अडचणी आणि त्यावर मात करण्याचे संभाव्य मार्ग, ऊर्जेचे संक्रमण आणि प्रवास, भारतीय शेतीसमोरील प्रमुख आव्हाने वर्तमान आणि भविष्य, बायोमास व्हॅलॉरायझेशन, टाकाऊ पासून टिकाऊ इत्यादी सारख्या विषयांवर संबंधित क्षेत्रातील आघाडीच्या तंत्रज्ञानाद्वारे सखोल चर्चा होणार आहेत, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान दररोज विविध विषयांवरील पॅनल चर्चांचे आयोजन आणि विविध व्याख्याने देखील होताना बघायला मिळतील. व्याख्यात्यांमध्ये शैक्षणिक, उद्योग, शासन संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश असेल. या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या अभ्यागतांना संपूर्ण आठवडाभर प्रयोगशाळेचे वेगवेगळे संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान आणि त्यांची उपलब्धी दर्शवणारे प्रदर्शन बघण्याची संधी उपलब्ध असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)