Pune News : भारतात स्कीनवर ट्रीटमेंट करु, बांगलादेशी तरुणीला आमिष, बुधवार पेठेतील छापेमारीत 7 महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत सामाजिक सुरक्षा विभागाची छापेमारी करण्यात आली आहे. बुधवार पेठेतील 7 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे.
Pune Crime News Updates : पुणे : पुण्यातील बुधवार पेठेत सामाजिक सुरक्षा विभागाची छापेमारी करण्यात आली आहे. बुधवार पेठेतील 7 बांगलादेशी (Bangladesh) महिलांना अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर ओळख करून तुझी भारतात त्वचारोगाची ट्रीटमेंट करू, असं आमिष दाखवून बांगलादेशी महिलेला कुंटणखान्यात बोलवल्याचा प्रकार उघड झाला आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील बुधवार पेठ परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांवर पुणे पोलिसांची नजर आहे. बांगलादेशी महिलांवर कारवाईची सामाजिक सुरक्षा विभागाची एक महिन्यात तिसरी कारवाई करण्यात आली आहे.
बुधवार पेठेत राहणाऱ्या या बांगलादेशी महिलांकडे भारतात येण्याचा कोणताही पुरावा नसल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे बुधवार पेठेतील कुंटणखाना चालवणाऱ्या महिलांना सामाजिक सुरक्षा पथकाने केली अटक केली आहे. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर पीटाअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
बुधवार पेठ बनत आहे बांगलादेशींं नागरिकांचा अड्डा?
मागील काही दिवसांपासून पुण्यात बांगलादेशी नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक राहत असल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता पुणे पोलीस बांगलादेशी नागरिकांबाबतीत अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं बघायला मिळालं आहे. बांग्लादेशी महिना आणि पुरुषांवर पोलिसांनी करडी नजर ठेवल्याचं दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. विशेष मोहिमेंतर्गत 19 बांगलादेशींना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. यात 10 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश होता.
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात हे बांगलादेशी लोक राहत होते. यातील 10 महिला बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत होत्या तर पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. बुधवार पेठेतील सागर नावाच्या इमारतीतून या 19 जणांना ताब्यात घेतलं होतं. या 19 जणांकडे कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत. तसेच भारत बांगलादेशी सीमेवरुन अनधिकृत भारतात प्रवेश केल्याचं देखील समोर आलं होतं.
पुण्यात बांगलादेशी वाढले...
मागील काही वर्षात पुण्यात पाच हजार बांगलादेशी नागरिक वाढले असून इतरही जिल्ह्यात ही संख्या वाढल्याचं बोललं जातं आहे. पोलिसांकडून बांगलादेशींवर कारवाई होताना दिसत नसल्याने घुसखोरांचे फावल्याचं दिसत होतं. त्यामुळे बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला होता. दरम्यान पोलिसांना विशेष शोध मोहीम राबवण्याचे आदेश असून त्याअंतर्गत बांगलादेशी घुसखोर शोधणे, त्याची ओळख पटवणे तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सर्वांचा तपास करणे अशा कामांना वेळ लागत असल्याने पोलिसांकडून या कारवाईकडे डोळेझाक केली जाते आहे का? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :