एक्स्प्लोर

Pune Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेनंतर ट्रकने पेट घेतला, चार जणांचा होरपळून मृत्यू

Pune Navale Bridge Accident : दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाल्यानंतर एका कंटेनरने पेट घेतला आणि त्यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला आहे. कंटेनरची धडक झाल्याने ट्रकने पेट घेतला आणि त्याला आग लागली. या आगीत ट्रकच्या केबीनमध्ये बसून प्रवास करणारे चारजण होरपळून मृत्यूमुखी पडलेत. तर इतर जखमी झालेत.  ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.   

पुण्यातील नवले पुलावर अपघाताचं सत्र (Pune Navale Bridge Accident) सुरूच असून पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला आहे. हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. मक्याचा भुसा घेऊन साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कंटेनर रस्त्यावरच उलटला. मात्र धडक मोठी बसल्याने ट्रकला क्षणातच आग लागली. यात ट्रकच्या केबिन मध्ये बसलेले चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले.

चार जणांचा मृत्यू

अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांचा आकडा चार इतका आहे. तर दोन गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली आहे. परंतु नवले पूल हा किती धोकादायक आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या पुलाची रचना चुकीची असल्याचं अनेकांनी वेळोवेळी निदर्शनास आणली आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. 

पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी बदनाम झाला आहे. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

नवले पुलाने आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा जीव घेतला

सन 2014 पासून आतापर्यंत दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 186 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget