एक्स्प्लोर
Advertisement
भटक्या कुत्र्यांची नसबंदी, पुणे मनपाचं 72 लाखांचं बजेट
पुणे: पुणे महापालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जालिम उपाय केला आहे.
महापालिका मोकाट आणि भटक्या कुत्र्याच्या नसबंदी शस्त्रक्रिया आणि अँटी रेबीज लसीकरणासाठी 72 लाख रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक कुत्र्यासाठी 655 रुपये इतका खर्च येणार आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी याबाबतचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.
यानुसार मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांची नसबंदी, अँटी रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात चार ठिकाणी श्वान संगोपन केंद्र सुरु करण्याचा विचार आहे.
दर तीन महिन्यांनी भटक्या कुत्र्यांची संख्या आणि नसबंदी झालेल्या कुत्र्यांची संख्या यांचा अहवाल पालिकेत सादर करावयाचा आहे.
नागरिकांना भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा अतोनात त्रास होतो. त्यामुळे अशा कुत्र्यांना अटकाव घालावा, यासाठी पुणे महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. दरवर्षी असे कार्यक्रम हाती घेतले जातात.
यंदाही नसबंदी शस्त्रक्रिया आणि अँटी रेबीज लसीकरणासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. यापैकी 4 पात्र निविदा धारकांना प्रत्येकी 18 लाखाचं काम देण्यात येणार आहे.
त्यात अॅमनिमल वेल्फेअर असोसिएशन, सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅानिमल्स नांदेड, पीपल्स फॉर अॅयनिमल्स आणि ब्ल्यू क्रॉस सोसायटी यांचा समावेश आहे. या चारही संस्थांसोबत 31 मार्च 2018 पर्यंत करार करण्यात आला आहे. नसबंदी शस्त्रक्रिया आणि अँटी रेबीज लसीकरण, कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि सोडण्याची रक्कम म्हणून एका कुत्र्यासाठी 655 रुपये खर्च दिला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement