Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग सुसाट; 4 दिवसांत 52 हजारांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या नव्या पुणे मेट्रो (Pune Metro) मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते 6 मार्च रोजी उद्घाटन झाल्यापासून पुणेकर मेट्रो सुसाट सुरु असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे
पुणे : रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या नव्या पुणे मेट्रो (Pune Metro) मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते 6 मार्च रोजी उद्घाटन झाल्यापासून पुणेकर मेट्रो सुसाट सुरु असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. 52 हजारांहून अधिक प्रवाशांनी त्याचा वापर केला आहे. या मार्गाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
पंतप्रधानांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे उद्घाटन अनेक महिने पुढे ढकलण्यात आले. हे उद्घाटन 19 फेब्रुवारीला होणार होतं, पण पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याने विलंब झाला. अखेर 6 मार्चरोजी अवघ्या काही सेकंदात कोलकात्यातून मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्यात त्यांना यश आले. पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले.
6 आणि 7 मार्च रोजी प्रवाशांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिल्याचे पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले. या दोन दिवसांत 52 हजार 763 प्रवाशांची नोंदणी झाली. त्यातून 4 लाख 33 हजार रुपयांचा महसूल मिळाला. ही मार्गिका रामवाडीला पीसीएमसी क्षेत्राशी आणि कोथरूड ते रामवाडीला जोडतो. येत्या आठवडय़ात प्रवासी संख्येत वाढ होईल, असा अंदाज मेट्रोच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
मेट्रोच्या एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, तो शनिवार पेठेजवळील एका कार्यालयात काम करतो. तो बसने प्रवास करत होता आता मात्र मेट्रोने त्याचा प्रवास सोपा झाला आहे. वनाझ ते रामवाडी या 15 किमी मार्गावर 15 स्थानके आहेत. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मार्गावर बंड गार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. पीसीएमसी ते फुगेवाडी हा सात किलोमीटरचा आणि वनाझ ते गरवारे कॉलेज या पाच किलोमीटरच्या भागाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते 6 मार्च 2022 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर 1 ऑगस्ट 2023 रोजी गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक ( 4.75किमी) आणि फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट (6.91 किमी) या पुणे मेट्रो मार्गाचं त्यांनी उद्घाटन केले.
तिकीट दर किती ?
वनाज ते रामवाडी- 30 रुपये
रुबी हॉल ते रामवाडी- 20 रुपये
रुबी हॉल ते रामवाडी कोणते स्टेशन्स पडणार?
रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेवर तीन स्टेशन्स पडणार आहेत. बंड गार्डन, येरवडा आणि कल्याणी नगर या तिन्ही स्टेशनची नावं आहेत.
इतर महत्वाची बातमी-