एक्स्प्लोर

Hinjawadi-shivaji Nagar metro:नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे विद्यापीठ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या चौकात लवकरच मेट्रोचे कामही होणार आहे.

Hinjawadi Shivaji Nagar Metro: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Sppu) येथील उड्डाणपुलाचे काम  हिंजवडी-शिवाजीनगर (Hinjawadi shivaji nagar metro) मेट्रोच्या कामासोबत सुरू होणार आहे. या बांधकामामुळे या भागातील वाहतूक कोंडीत वाढ होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्र्यांना उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग  कसा बांधला जाईल, हे दाखवून त्यांच्या संमतीनंतरच कामाला सुरुवात करावी, असा निर्णय घेण्यात आला. नव्या सरकारमध्ये पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेची आता शहराला प्रतीक्षा आहे.

गणेशखिंड रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो आणि इतर कामांचा आढावा घेण्यासाठी काल पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि वाहतूक पोलिसांच्या विविध विभागांची संयुक्त बैठक झाली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे, पीएमसीचे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे विद्यापीठ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या चौकात लवकरच मेट्रोचे कामही होणार आहे. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीसाठी महापालिकेने 400 कोटींचा आराखडा तयार केला आहे मात्र हे काम पीएमआरडीए करणार आहे. या कामात विद्यापीठ चौकातील डबलडेकर उड्डाणपूल (268 कोटी), शिवाजीनगर-औंध भुयारी मार्ग (68 कोटी), बाणेर-पाषाण (25 कोटी), हरे कृष्ण मंदिर भुयारी मार्ग (15 कोटी), अभिमानश्री चौक भुयारी मार्ग (40 कोटी) यांचा समावेश आहे. 

मेट्रोचे काम पीएमआरडीकडून येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे, त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील हे प्रकल्प त्याच कालावधीत पूर्ण करणार आहेत. आज बोलावलेल्या बैठकीत हे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काम सुरू झाल्यानंतर गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढणार आहे. पर्यायी वाहतूक मार्ग सुरू करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. पादचारी मार्ग आणि सायकल मार्ग देखील बांधावे लागतील. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री झाल्यानंतरच विद्यापीठ चौकासह बाकी ठिकाणी काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोंडी कमी करण्यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो बॅरिकेडिंगसाठी कमी जागा वापरा, ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे तेथून बॅरिकेडिंग काढून रस्ता खुला करा,  गणेश खिंड रस्त्यावर पादचारी मार्ग आणि सायकल मार्ग लहान करा, रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुजवा, कामात अडथळा निर्माण करणाऱ्या पाण्याचे नळ तात्काळ काढा,  पुणे सेंट्रल मॉलकडून शिवाजीनगरकडे जाताना उजवीकडे वळण्यास मनाई असेल, कृषी महाविद्यालयातील उड्डाणपुलाखालून यू-टर्न घेऊन जाणं शक्य असेल, या सगळ्या सूचनांचा समावेश आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget