एक्स्प्लोर

Mulidhar Mohol : पुण्याच्या पैलवानानं मैदान मारलं; मुरलीधर मोहोळांच्या विजयाची पाच कारणं?

राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे  लोकसभा मतदार संघात (Pune Loksabha Constituency) भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी बाजी मारली आहे.

पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे  लोकसभा मतदार संघात (Pune Loksabha Constituency) भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी बाजी मारली आहे. 86369 मताधिक्यानं ते विजयी झाले आहे. 415543 मतं मिळवून त्यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना पराभूत केलं आहे. मुरलीधर मोहोळांना साधारण पर्वती, कोथरुड परिसरातून मोठं मताधिक्य मिळालं आहे. मुरलीधर मोहोळांची जादु चालली आहे. मोहोळांची जादु चालणार नाही, असं धंगेकर म्हणाले होते. मात्र अखेर मुरलीधर मोहोळांनी विजय खेचून आणला आहे. 

वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ या सहा मतदार संघापैकी कोथरुड, पर्वती, वडगाव शेरी, शिवाजीनगर हे भाजपचे मतदार संघ मानले जातात. त्यामुळे या मतदार संघातून मोहोळांना जास्त मतधिक्य मिळाल्याची शक्यता आहे. मात्र कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ मतदारसंघातून त्यांना किती मताधिक्य मिळालं हे पाहावं लागणार आहे. 

भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी भाजपच्या बऱ्याच नेत्यांची नावं चर्चेत होती. जगदीश मुळीक, सुनिल देवधरांचं नाव चर्चेत होतं. मात्र सुनिल देवधर यांनाच उमेदवारी मिळणार असं निश्चित होतं मात्र मुरलीधर मोहोळांना उमेदवारी देण्यात आली. मुरलीधर मोहोळांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी दांडगा  संपर्क आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बानवकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी दांडगा  संपर्क आहे. त्यासोबतच कोव्हिड काळात ते महापौर होते आणि त्यावेळी त्यांनी पुण्यात चांगलं काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या नाव पुढे आलं आणि त्यांना शुअर सीट वाटत असल्याने भाजपने उमेदवारी दिली. 

विजयाची पाच कारणं?

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: प्रचारासाठी पुण्यात आले होते. 

2. भाजपने मोठी फळी कामाला लावली होती. सगळ्या नेत्यांचा खंबीर पाठिंबा होता. 

3. निवडणूक प्रचाराचं योग्य नियोजन

4. राज ठाकरेंची प्रचारसभा पार पडली.

5. निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून होते.

 

मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकीर्द?

  • पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी 2002, 2007, 2012 आणि 2017 झाले आहेत
  • 2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते.
  • उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद 
  • पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष 2017-2018
  • संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) -2017-2018
  • संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) 2017-2018
  • सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) 2017-2018
  • 2009 मध्ये खडकवासला (पुणे) मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार 

इतर महत्वाची बातमी-

Pune Lok Sabha Result 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत

 
 
 
 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget