Pune Jain Boarding: आम्ही आमच्या बाजूने व्यवहार रद्द करण्यासाठी तयार; गोखले बिल्डरकडून वकिलांमार्फत कोर्टात माहिती, जैन बोर्डिंग जागेसंदर्भातील सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?
Pune Jain Boarding: न्यायमुर्ती कलोटी यांनी मूळ अर्ज तपासून घ्यायला हवा, चॅरिटी कमिशनर विषयी कोणतीही तक्रार नसताना माध्यमांमध्ये काही गोष्टी आल्या यात अनियमितता असल्याचे म्हटले आहे.

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग (Pune Jain Boarding) जागेसंदर्भातील सुनावणी धर्मादाय आयुक्तालयात सुरू आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भातली सुनावणी वेळी एन.एस.आनंद यांनी आपला वकालतनामा धर्मादाय आयुक्तालयाकडे (Pune Jain Boarding) दिला. तसेच कालच आपल्याकडे या संपूर्ण प्रकरणा संदर्भातील कागदपत्र आली असून आम्हाला युक्तीवादापूर्वी अभ्यास करण्यासाठी १ ते २ दिवस मिळावे ही विनंती केली आहे. त्यावर न्यायमुर्तींनी ३१ ऑक्टोंबरची तारीख ठरवण्यात आली आहे. 31 ऑक्टोंबरची सुनावणी गोखले बिल्डरच्या (Pune Jain Boarding) वकिलांना त्यांची बाजू मांडण्यासाठी दिलेली आहे. त्यावर जैन समाजाकडून युक्तीवाद करत असलेले वकिल योगेश पांडे यांनी तो पर्यंत मागील निर्णय 'स्टेटस्को' हा तसाच ठेवावा ही विनंती केली आहे. न्यायमुर्ती कलोटी यांनी मूळ अर्ज तपासून घ्यायला हवा, चॅरिटी कमिशनर विषयी कोणतीही तक्रार नसताना माध्यमांमध्ये काही गोष्टी आल्या यात अनियमितता असल्याचे म्हटले आहे. (Pune Jain Boarding)
Pune Jain Boarding: माध्यमांमधील चुकीच्या बातम्यांवरून न्यायमुर्तींनी वकिलांना सुनावले खडेबोल
राज्यात साडे आठ लाख अर्ज आहेत. अनेक विविध अर्ज येतात, या प्रकरणात अनियमितता झाली असल्याने मी प्रत्येक कागदपत्र तपासायला सांगत असल्याचे न्यायमुर्ती कलोटी म्हणालेत. चुकीचे गैरसमज माध्यमांमध्ये आले त्यावर चर्चा करू असंही न्या कलोटी यांनी म्हटलं आहे. माझ्याकडे दाखल झालेली कागदपत्रे जी ठेवण्यात आली त्यात काही चूक झाली आहे का? जर तसं झालं असेल तर मी सार्वजनिक रित्या ती वाचायला तयार आहे असंही न्यायमुर्ती कलोटी यांनी म्हटलं आहे. सुनावणीसाठी याचिकाकर्ते, त्यांचे वकील आणि जैन धर्मातील काही लोक उपस्थित आहेत युक्तीवाद सुरू आहे. माध्यमांमध्ये आलेल्या चुकीच्या बातम्यांवरून न्यायमुर्ती कलोटी यांनी वकिलांना खडेबोल सुनावले आहेत.
Pune Jain Boarding: याचिकाकर्त्यांच्या वकिलांना आयुक्तांनी सुनावलं
माध्यमांतील बातम्यांबद्दल धर्मादाय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांना आयुक्तांनी सुनावलं आहे. महाराष्ट्रातील ट्रस्ट संदर्भात एकही निकाल अधिकारी अश्याने देणार नाहीत केवळ मोठ्या लोकांची नाव ऐकून गप्प बसण्याचा निर्णय घेतील असे व्हायला नको, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर कुठलेही ट्रस्ट हे एका विशिष्ट धर्मासाठी म्हणून बनवत नाही ते फक्त ट्रस्ट असते असं वकीलांनी म्हटलं आहे.
Pune Jain Boarding: आम्ही आमच्या बाजूने हा व्यवहार रद्द करण्यासाठी तयार
पुण्यातील जैन बोर्डिंग सुनावणीमध्ये बिल्डर तर्फे व्यवहार कॅन्सल करण्याच्या पत्रावर ट्रस्ट सहमत असल्याची सूत्रांची माहिती आहे. बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून व्यवहार रद्द करण्याचा मेल ट्रस्टी यांना करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आमची बदनामी झाली, तसेच अधिकाऱ्यांना सुद्धा काम करताना अडचणी येत असल्याची धर्मदाय आयुक्त यांचे म्हणणे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच अधिकाऱ्यांच्या समवेत ही सुनावणी लाईव्ह सुरू असून तसेच सध्या ज्या ज्या मुद्द्यांवर मीडियामध्ये चर्चा झालेली त्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे असं आयुक्तांचे म्हणणे आहे. जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आम्ही रद्द करायला तयार असल्याची माहिती बिल्डर विशाल गोखलेंनी धर्मदाय आयुक्तांना दिली आहे. गोखले बिल्डरकडून वकिलांमार्फत कोर्टात ही माहिती दिली आहे. आम्ही आमच्या बाजूने हा व्यवहार रद्द करण्यासाठी तयार आहोत, विशाल गोखले यांच्या वकिलांची धर्मदायुक्तांना माहिती दिली आहे, ट्रस्टच्यावतीनेही व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत, गोखले ग्रुपने माघार घेतल्यानंतर आता ट्रस्टही अधिकृत माघार घेणार आहे.
























