Pune Indapur Crime : इंदापूरमध्ये मोठी खळबळ, दिवसाढवळ्या महिलेसह लहान मुलांवर सत्तुराने वार
इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी कोण? त्याने हे कृत्य का केले? याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पुणे : इंदापूर (Indapur) तालुक्यातील भांडगावमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीनो दारुच्या नशेत 30 वर्षीय महिलेवर आणि दोन लहान बाळावर सत्तुराने वार केले आहेत. आरोपी जेव्हा सत्तुराने हे वार करत होता तेव्हा गावकऱ्यांनी (Pune Crime News) हे कृत्य पाहिलं आणि या आरोपीला गावकऱ्यांनी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
समोर आलेल्या माहितीनुसार , सुरेश उमाजी मदणे ऊर्फ गोट्या असं आरोपीचं नांव आहे. इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेत तीन वर्षाची प्रियल लक्ष्मण चव्हाण ही लहान मुलगी जखमी झाली असून तीच्या मानेवर मागील बाजूस जखम झाली आहे. सध्या तिच्यावर सध्या अकलूज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सोनाली शाम जाधव ही तीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिचा दीड वर्षाचा शिवांश शाम जाधव हा लहान मुलगा देखील जखमी झाला आहे. या दोघांवर सध्या इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी कोण? त्याने हे कृत्य का केले? याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद
पिंपरी चिंचवडमध्ये देखील एक घटना समोर आली आहे. जत्रेत फिरायला गेलेल्या एका तरुणाला तिघांनी धमकी दिली. गलत लडकी से दोस्ती की, आज तुझे जिंदा नहीं छोडेंगे', असे म्हणत प्राणघातक हल्ला करून चाकूने व फळीने मारहाण केली. चिखली येथील जाधववाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
कमलेश ऊर्फ नन्या क्षीरसागर (23, रा. कुदळवाडी, चिखली), एजाज ऊर्फ अज्जू गणी शेख (20, रा. बालघरे वस्ती, चिखली) यांना पोलिसांनी अटक केली. एका 16 वर्षीय मुलालाही ताब्यात घेतले. फिर्यादी सनी जत्रेमध्ये गेले असता संशयित तेथे आले व त्यांनी विनाकारण त्यांना मारहाण केली. आसपासच्या नागरिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली.सध्या जिल्ह्यातील अनेक भागात तरुणांच्या टोळ्या हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. खंडणी वसूल करणे, धमकावणे, दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील अनेक भागात हे तरुण हातात कोयते घेऊन फिरताना दिसतायत. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहेच शिवाय व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता आहे.
हे ही वाचा :