एक्स्प्लोर

Pune Crime news : तरुणींची पुणे पोलिसांना Whatsapp वर तक्रार; लिफ्टच्या बाहण्याने विनयभंग करणाऱ्याला अटक

शहरातील अनेक मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एका 44 वर्षीय व्यक्तीला चतुश्रृंगी पोलिसांनी  अटक केली आहे. आजारी असल्याचं सांगून मुलींना लिफ्ट मागायचा आणि बळजबरीने गाडीवर मुलींचा विनयभंग करत होता.

Pune Crime news : शहरातील (Pune Crime News)अनेक मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एका 44 वर्षीय व्यक्तीला चतुश्रृंगी पोलिसांनी  अटक केली आहे. आजारी असल्याचं सांगून मुलींना लिफ्ट मागायचा आणि बळजबरीने गाडीवर मुलींचा विनयभंग करत होता. या प्रकरणी काही मुलींना पोलिसांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केलं.

अनुप प्रकाश वाणी असं त्या आरोपीचं नाव आहे. रस्त्यावर बिनधास्तपणे मुलींवर बळजबरी करायची आणि त्याच्या स्कूटीवर बसून तो त्यांचा विनयभंग करायचा. 11 जुलै रोजी त्यांच्या एका पीडितेने महिलांच्या मदतीसाठी दिलेल्या टोल-फ्री नंबरद्वारे तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी वाणीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला सेनापती बापट रोड येथील बालभारती इमारतीजवळ तिच्या मैत्रिणीसोबत असताना वाणी त्याच्या स्कूटीवर आला आणि त्यांच्यासमोर थांबला. त्याने त्यांना चक्कर येत असल्याचे सांगितले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात सोडण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मध्येच आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्यास सुरुवात केली. पीडितेने काही लोक उभे असलेल्या ठिकाणी वाहन थांबवून मदतीसाठी आरडाओरड केली.  आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी अविवाहित असल्याचे समोर आले असून नैराश्यात त्याने हे सर्व कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या बोलण्यावर माझा विश्वास होता आणि मी त्याला वैद्यकीय मदतीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र,मी त्याच्या दुचाकीवर बसताच त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. मी वाहन थांबवले आणि त्याला रस्त्यात सोडले, असंही पिडितेने सांगितलं आहे.

दुसरी मुलगी शिवाजी नगरची रहिवासी आहे. ती वाणीला भेटली. ती म्हणाली की, मी कोथरूडजवळील एका बँकमध्ये  काम करते. 3 जुलै रोजी एका अज्ञात व्यक्तीने मॉडर्न कॉलेजजवळ माझ्याकडे येऊन मदत मागितली. जेव्हा मी त्याला माझ्या वाहनावर बसण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला आणि मला त्याऐवजी त्याची स्कूटी चालवण्याची विनंती केली. पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि ते ठिकाण सोडले. नाहीतर त्यांने माझाही विनयभंग केला असता. 

यासंदर्भात पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, गुन्हेगारांनो आता सगळी माहिती whatsapp वर मिळत आहे. त्यामुळे सावध रहा. आम्ही नागरिकांना व्यासपीठ दिलं आहे. त्यांच्या तक्रारी पाहून तातडीने कारवाई होणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Pune City Police (@punepolicecity)

हेही वाचा-

Pune Crime News : दारु पितो म्हणून पत्नीनेच पतीला संपवलं अन् नंतर जे केलं ते...; पुण्यातील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
Embed widget