Pune Crime News : दारु पितो म्हणून पत्नीनेच पतीला संपवलं अन् नंतर जे केलं ते...; पुण्यातील घटना
एका महिलेने तिच्या भावाला सोबत घेत तिच्या पतीवर काठ्यांनी हल्ला करून त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह पुणे शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या सणसवाडी येथे एका निर्जनस्थळी फेकून दिलं.
Pune Crime News : एका महिलेने तिच्या भावाला सोबत (Pune Crime News) घेत तिच्या पतीवर काठ्यांनी हल्ला करून त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह पुणे शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या सणसवाडी येथे एका निर्जनस्थळी फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित शरद चिंग्या काळे (45) हा मद्यपी होता, त्यामुळे त्याची पत्नी सुनीता हिचे त्याच्याशी नेहमी भांडण होत असे. रात्री 8.30 च्या सुमारास बुधवारी (12 जुलै) महिला आणि तिचा भाऊ जिगर्या सुरेश भोसले, दोघेही सणसवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी काळे यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी जीव जाईपर्यंत हल्ला केला. शिक्रापूर पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनीताला अटक करण्यात आली आहे तर तिचा भाऊ फरार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
काळे यांच्या बहिणीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, काळे यांना दारूचे व्यसन असून कुटुंबात वाद हे नेहमीचेच होते. 12 जुलै रोजी या दोघांनी काळे यांच्या घरासमोर लाठ्याकाठ्या मारताना पाहिले. फिर्यादीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता महिलेचा भाऊ असलेल्या भोसलेने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपीने क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला, त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या. तो मृत झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी मृतदेह सणसवाडीजवळ एका निर्जन ठिकाणी फेकून दिला, असं पोलिसांनी सांगितले.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर सांगितले की, महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. महिला आणि तिचा नवरा यांच्यात मतभेद होते. नवरा काळे हा मद्यपी होता, त्यामुळे महिला आणि तिचा भाऊ नेहमी त्याच्याशी भांडत असत. हेच भांडणं टोकाला गेले आणि बहिण भावाने मिळून बहिणीच्या नवऱ्याने हल्ला करुन हत्या केली आहे.
दारुमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त
पुण्यातच नाही राज्यभरात अनेक घरं फक्त दारुमुळे उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर येतात. कधी दारु पिऊन अनेक लोक घरगुती हिंसाचाराचे बळी पडत असतात. त्यात अनेक घरांमध्ये वादही होत असतात. हे वाद टोकाल गेले की अनेक टोकाचे निर्णयदेखील घेतले जातात. त्यातच ही पुण्यातील घटना समोर आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. पोलीस या सगळ्याचा तपास करत आहेत.
हेही वाचा-