Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Pune Ganesh Visarjan: आज अनंत चतुर्दशी दिवशी (मंगळवारी १७ सप्टेंबर) मोठ्या तयारीसह जड अंतकरणाने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. आज दिमाखदार विसर्जन मिरवणुकी शहरभरात पार पडणार आहेत.
पुणे: पुण्यात वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे, आज अनंत चतुर्दशी दिवशी (मंगळवारी १७ सप्टेंबर) मोठ्या तयारीसह जड अंतकरणाने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. आज दिमाखदार विसर्जन (Pune Ganesh Visarjan) मिरवणुकी शहरभरात पार पडणार आहेत. त्यासाठी पोलिस प्रशासन, वैद्यकीय सुविधा, यांनी देखील जय्यत तयारी केली आहे. शहर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दरवर्षीच्या प्रथेनुसार महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पहिले पाच गणपती आणि त्यानंतर इतर गणेश मंडळे लक्ष्मी रोडसह केळकर, कुमठेकर, टिळक आणि कर्वे रस्ता अशा मिरवणूक मार्गांवरून विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ होतील. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू होणार असल्याची माहिती आहे. मिरवणुकीसाठी साडेसहा हजार पोलिसांचा मोठा फोडफाटा तैनात करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी मार्शलची पथके असणार आहेत.
गणेशभक्तांच्या सोयीसाठी १२ ठिकाणी पोलिसांनी मदत केंद्रे
विसर्जन मार्गावर गणेशभक्तांच्या सोयीसाठी १२ ठिकाणी पोलिसांनी मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. तर, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ३९ वॉच टॉवरची मिरवणुकीवर नजर ठेवून असणार आहेत. गणेश विसर्जनासाठी महापालिकेचीही यंत्रणा सज्ज झाली आहे. विसर्जन (Pune Ganesh Visarjan) घाटांवर जीवरक्षक तैनात असून, वैद्याकीय पथक सज्ज झाले आहे. यंदाची मिरवणूक ही लवकरात लवकर संपवण्याचे पोलिसांचे नियोजन असणार आहे.
गणरायाच्या निरोपासाठी घराघरांतील आबालवृद्ध आणि सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झालेत. तर, मिरवणुकांमध्ये रंग भरण्यासाठी ढोल-ताशा पथके, शंखनाद, टिपरी, लेझीम पथकांची तयारीही पूर्ण झाली आहे. विसर्जनाच्या (Pune Ganesh Visarjan) पार्श्वभूमीवर मानाच्या मंडळांसह इतर मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ सजवण्यात आलेले आहेत. आकर्षक फुलांपासून एलईडी दिव्यांची रोषणाई, धार्मिक, सामाजिक संदेश देणारे देखावे रथ साकारण्यात आलेले आहेत. कालपासूनच शहरातील विविध भागांत विसर्जन रथाच्या तयारीची लगबग सुरू झाली होती, तयार झालेले मंडळांचे रथ तयार झाल्याने ते मांडवस्थळी लावण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा बहुतांश सार्वजनिक मंडळांनी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता तसेच केळकर रस्ता आदी मार्गाच्या मुख्य चौकाच्या अलीकडे विसर्जन रथ उभे केले असल्याचं दिसत आहे.
वाजी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक सुंदर रथ सज्ज
शिवाजी रस्त्यावर विसर्जन (Pune Ganesh Visarjan) मिरवणुकीसाठी अनेक सुंदर रथ सज्ज आहेत. ज्या पद्धतीने पुण्यात वेगवेगळ्या मंडळाकडून सुंदर देखावे तयार केले जातात, वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती उभारले जातात तेवढेच सुंदर विसर्जन रथ देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. सुंदर फुलांनी सजलेले हे रथ पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते हे सर्व रथ आता सजून तयार आहेत.
पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौकात बाप्पाल निरोप देण्यासाठी रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात येत आहे सोशल मीडिया साइबर क्राइम या थीम वर रांगोळी काढून सामाजिक संदेश दिला जाणार आहे.