एक्स्प्लोर

Pune Ganesh visarjan 2023 : बाप्पाला निरोप देताना आभाळ गहिवरलं; पुण्यात भर पावसात मिरवणुकीतील जल्लोष कायम

पुण्यात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. त्याचवेळी पुण्यात विविध परिसरात वरुन राजाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुण्यातील चौकाचौकात पुणेकरांची खच्च गर्दी दिसत आहे.

पुणे : पुण्यात मोठ्या जल्लोषात बाप्पाला(Pune Ganeshotsav 2023) निरोप देण्यात येत आहे. त्याचवेळी पुण्यात वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे पुण्यातील चौकाचौकात पुणेकरांची गर्दी दिसत आहे. भर पावसात पुणेकर मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप देताना दिसत आहे. एकीकडे ढोल ताशाचा दणदणाट ऐकायला मिळत आहे तर दुसरीकडे पावसाने हजेरी लावल्याने उत्साह द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याने अनंत चतुर्दशीला दुपारनंतर पाऊस येणार असं सांगितलं होतं. त्यानुसार आज  पुण्यात सुमारे साडेतीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे काही प्रमाणात तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र बाप्पाचं रुप पाहून अनेक लोक पुन्हा जल्लोष उरी भरल्याचं पाहायला मिळालं. 

पावसामुळे पुण्यातील अलका टॉकीज चौकात अनेक पुणेकर छत्री हाती घेत बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी थांबले आहे. अलका टॉकीज चौकात तुरळक पाऊस पडत आहे. मात्र पुण्यातील बाकी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे आणि अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे.

आपात्कालीन परिस्थितीत घाबरु नका...

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. त्यामुळे अनेकदा अनुचित घटना घडण्याची भीती असते. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि काही सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 101 या क्रमांकावरून अग्निशामक दलाशी संपर्क साधा.गणेशमूर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरीपासून लांब उभे करा.नाव, होडीतून गणपती विसर्जन करताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींनी बसू नका.महापालिकेतर्फे नदीकाठी जीवरक्षक नियुक्त केले आहेत, त्यांच्याकडून मूर्तीचे विसर्जन करवून घ्या.एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास जीवरक्षकांना तातडीने माहिती द्या. पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झालेला असल्यास अशा ठिकाणी काळजीपूर्वक वावरा. अनुचित प्रकार, अनुचित घटना टाळण्यासाठी गणेश मूर्तीचे विसर्जन महापालिकेने बांधलेल्या हौदातच करा,अशा सुचना देण्यात आल्या आहेत. 

पावसात पण थाटात दगडूशेठ गणपतीची मिरवणूक 

गणाधीश रथावर दगडूशेठ गणपती दिमाखात विराजमान झाले आहे. एक झलक पाहण्यासाठी पुणेकरांची तौबा गर्दी केली आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक थाटात निघाली आहे.यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला आहे.विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे. दगडूशेठ गणपतीला डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनेक पुणेकरांनी गर्दी केली आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Ganeshotsav 2023 : अलका चौकात भव्य 100 फुटाची रांगोळी रेखाटायला सुरुवात; पाहा ड्रोन फोटो...

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव? सुनेत्रा पवारांनी बारामतीतून स्पष्टच सांगितलं
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव? सुनेत्रा पवारांनी बारामतीतून स्पष्टच सांगितलं
Pune Crime News: पुण्यात संतापजनक घटना, 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कॅफेत बोलावलं अन् नको ते केलं, फोटोही व्हायरल; पोलिसांकडून हादरवणारी माहिती
पुण्यात संतापजनक घटना, 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कॅफेत बोलावलं अन् नको ते केलं, फोटोही व्हायरल; पोलिसांकडून हादरवणारी माहिती
Vidhan Parishad Election 2026: पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगितली Inside Story
पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगितली Inside Story
Balasaheb Thorat on Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray :कॉकरोच ना कमी लेखू नका, हा जंतरमंतरवरील आंदोलनाचा इशारा, नीटच्या पीडित तरुण- तरुणींचा आक्रोश सरकारला ऐकावाच लागेल : उद्धव ठाकरे
हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेत रणरणत्या उन्हात रस्त्यावर; कॉकरोच ना कमी लेखू नका : उद्धव ठाकरे
Cockroach Janata Party: 'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
LIC : एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, 3 जूनला 51750 शेअरची खरेदी
एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, किती कोटी मोजले?
India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Embed widget